Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 5, 2026
in सोलापूर
0
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 29;

0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मंडल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह

औराद  :
औराद महसूल मंडळाच्या कार्यक्षेत्रातील बंकलगी, सांजवाड आणि राजूर शिवारात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उपसा सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतानाही संबंधित यंत्रणा आणि मंडल अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा परिसरात रंगली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औराद मंडल अधिकारी कार्यक्षेत्रातील अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या मुरूम उपसा सुरू आहे. विशेषतः बंकलगी व राजूर शिवारातील रस्त्यालगतच्या शेतांमध्ये मोठमोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत. काही वाहनांद्वारे दररोज मोठ्या प्रमाणावर मुरूम वाहतूक होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकाराकडे महसूल प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता आणि शासनाचा महसूल बुडवून मुरूम उपसा सुरू असताना कारवाई होत नाही. उलट घरबांधणी किंवा शेतीच्या कामासाठी मुरूम टाकणाऱ्या सामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते, अशी भावना परिसरात व्यक्त होत आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या कारभाराबाबत दुजाभावाची भावना निर्माण झाल्याचे नागरिक सांगत आहेत.
या संदर्भात मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अवैध मुरूम उपसा सुरू ठेवण्यासाठी काही व्यक्ती प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा सुरू असून, यामुळे संशय अधिकच बळावला आहे.
तसेच अवैध मुरूम उपशाविरोधात आवाज उठविणाऱ्या नागरिकांवर दबाव टाकला जात असल्याचे आरोपही समोर येत आहेत. तक्रारदारांशी अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून महसूल विभागातील संबंधित अधिकारी व अवैध उपशास मदत करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

….
उपोषणाचा इशारा

…
अवैध मुरूम उपसा रोखण्यासाठी तसेच महसूल विभागातील कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी तातडीने कारवाई न झाल्यास मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे प्रशासन कोणत्या भूमिकेतून पाहते, याकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे.

….

तहसीलदारांवर वाॅच ठेवणार्‍यांवर कारवाई कधी ?
..,.
तहसील कार्यालयामधील अधिकार्‍यांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध ठेऊन व मंद्रूप तहसीलदारांवर दररोज शेकडो ब्रास अवैद्य मुरूम सुरू आहे. अधिकार्‍यांवर वाॅच ठेऊन व शासनाची राॅयल्टी बुडवून मुरूम उपशास सहकार्य करणार्‍या व्यक्तींवर कारवाई कधी होणार ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
…
औराद मंडल अधिकार्‍यांचा मनमानी कारभार
…
औराद शिवारात मोठ्या प्रमाणात अवैद्य मुरूम उपसा सुरू असताना मंडल अधिकार्‍यांकडून दंडात्मक कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. निवृत्त तलाठ्याच्या टिपरमधून मुरुम उपसा सुरू असल्याने त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. शिवाय शेतकर्‍यांची अनेक शेतीविषयक नोंदी प्रलंबित ठेऊन शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचे काम करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्या मंडल अधिकार्‍यांवर वरिष्ठांचे आशीर्वाद आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*
Previous Post

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

Next Post

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135543

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697