होटगी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन व्हनमाने यांच्या गाडीला टिपरने दिली धडक
दक्षिण सोलापूर …
साखर कारखाना ते होटगी रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे . या रस्त्याच्या कामाला अवैद्य मुरूम उपसा होत असल्याबाबत व रस्त्याचे काम निकृष्ट सुरू असल्या बाबत तक्रार केल्यामुळे ठेकेदाराच्या वाहनचालकां कडून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रारदार सचिन व्हनमाने यांनी सांगितले.
सचिन व्हनमाने घरगुती कार्यक्रमानिमित्त होटगी रस्त्यावरून पाटीलवाडा हाॅटेल जवळून शिरवळ कडे जात असताना समोरून पोकलेन आल्याने कार ( MH 13 EX 5656 )पाठीमागे घेत असताना मागून येणार्या टिपर MH 13 DQ 3749 ने जोराची धडक दिली. यामध्ये त्यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . रस्त्याच्या कामाविरोधात तक्रार केल्यामुळे ठेकेदाराकडून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचे व्हनमाने यांनी सांगितल. टिपर व वाहन चालकाविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…














