Friday, September 11, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

विश्वकल्याण, पर्यावरण शुद्धी आणि समाधानकारक पावसासाठी मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
August 22, 2026
in सोलापूर
0
विश्वकल्याण, पर्यावरण शुद्धी आणि समाधानकारक पावसासाठी मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सीना-भीमा खोऱ्यातील ४० गावांच्या पंचक्रोशीत पहिल्यांदाच भव्य धार्मिक सोहळा

मंद्रूप ः पवित्र श्रावणमासाचे औचित्य साधून मंद्रूप येथील श्री विठ्ठल राही – रुक्मिणी मंदिरात रविवारी २३ आॅगस्ट रोजी ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ तसेच ‘रुद्र स्वाहाकार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना-भीमा नदीच्या खोऱ्यातील ४० गावांच्या पंचक्रोशीत प्रथमच अभूतपूर्व यज्ञ सोहळा संपन्न होत आहे. श्री तीर्थराज भक्त मंडळ, तीर्थराज युवक मंडळ व तीर्थराज सत्संग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वेदशास्त्राचे अभ्यासक पंडित गौरवाचार्य हुंडेकरी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली हा महायज्ञ संपन्न होणार आहे. यज्ञाच्या पूर्वतयारीनिमित्त मंद्रूप येथील विठ्ठल मंदिरात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत हुंडेकरी गुरुजींनी यज्ञाचे महत्त्व, वैज्ञानिक व आध्यात्मिक अधिष्ठान तसेच यज्ञाने मिळणारे फलित याविषयी विठ्ठल परिवारातील सदस्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. विश्वकल्याण, पर्यावरण शुद्धी आणि सर्वदूर समाधानकारक पाऊस व्हावा, या उदात्त हेतूने हा महायज्ञ आयोजित करण्यात आल्याची माहिती मंडळाचे कार्यवाह विठ्ठल गंभिरे यांनी दिली.
रविवारी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत हा होम-हवन सोहळा होणार आहे.
या महायज्ञासाठी ६० पेक्षा अधिक दाम्पत्य यजमान म्हणून बसणार आहेत. यज्ञासाठी लागणारे सर्व प्रमुख पूजा साहित्य मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आले असून यजमानांनी सोवळे, पंचा व पूजेची वैयक्तिक भांडी सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त मंद्रूपसह सोलापूर शहर, परिसर आणि कर्नाटक सीमाभागातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत.
पुत्रदा एकादशी व श्रावण पर्वाच्या पार्श्वभूमीवर महायज्ञानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी भगर-आमटी, साबुदाणा खिचडी व मसाला दूध अशा फराळ-महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी पांडुरंग देवस्थान समिती, विश्वस्त मंडळ यांच्यासह ग्रामस्थ व विठ्ठल परिवार परिश्रम घेत आहेत.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

निकृष्ट रस्ताविरोधात तक्रार केल्यामुळे जीवे मारण्याचा प्रयत्न

Next Post

विधानसभेत महात्मा बसवेश्‍वरांचे तैलचित्र लावण्यात येणार – विश्‍वनाथ चाकोते

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
विधानसभेत महात्मा बसवेश्‍वरांचे तैलचित्र लावण्यात येणार – विश्‍वनाथ चाकोते

विधानसभेत महात्मा बसवेश्‍वरांचे तैलचित्र लावण्यात येणार - विश्‍वनाथ चाकोते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांकडून चौकशी करण्यास  टाळाटाळ

दोन महिने उलटले तरी ‘औरादच्या सर्कल’ची पोलखोल होईना

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

132738

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697