Friday, September 11, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

विधानसभेत महात्मा बसवेश्‍वरांचे तैलचित्र लावण्यात येणार – विश्‍वनाथ चाकोते

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
August 22, 2026
in सोलापूर
0
विधानसभेत महात्मा बसवेश्‍वरांचे तैलचित्र लावण्यात येणार – विश्‍वनाथ चाकोते
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वीरशैव महासभेच्या मुंबईतील कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिली मंजूरी

सोलापूर – अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे महाराष्ट्र शाखेच्या वतीने मुंबईत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीरशैव महासभेच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध मागण्यावर विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून विधानसभेत महात्मा बसवेश्‍वर महाराज यांचे तैलचित्र लावण्यास मंजुरी दिल्याची माहिती वीरशैव लिंगायत महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते यांनी दिली.
जगदगुरू श्री श्री श्री 1008 डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यामध्ये मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नाटक राज्याचे कॅबिननेट मंत्री ईश्‍वर खंडरे यांचा सत्कार तसेच देशभरातील वीरशैव लिंगायत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांचा यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

   प्रारंभी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्राच्या विधानसभेत महात्मा बसवेश्‍वरांचे तैलचित्र लावण्यात यावे आणि नवी मुंबई परिसरात वीरशैव समाजाला शासनाने एक एकर जागा द्यावी, त्या जागेवर देशभरातून मुंबईत येणार्‍या वीरशैव समाजाच्या मुलांसाठी तसेच माजबांधवांसाठी राहण्याची सोय व्हावी, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात वीरशैव समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे, वीरैशव लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा आणि अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली.

   माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सन 2013 मध्ये वीरशैव लिंगायत समाजाला अल्पसंख्याकचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. परंतु केंद्रात सरकार बदलले आणि ती मागणी प्रलंबीत राहिली असे प्रास्ताविकात विश्‍वनाथ चाकोते यांनी सांगितले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संमती देवून लवकरच विधानसभेत महात्मा बसवेश्‍वर यांचे तैलचित्र लावणार असल्याचे सांगितले. त्यानंतर कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी राज्यात मंत्रीमंडळात वीरशैव समाजाला प्रतिनिधीत्व देण्याबाबत सकारात्मकता निर्णय घेवू असे सांगितले.      त्यानंतर केएलईचे कुलगुरू डॉ.प्रभाकर कोरे यांना वीरशैवरत्न, बसव समितीचे अरविंद जत्ती यांना बसवरत्न, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना वीरशैव भुषण, बीदरचे माजी आमदार अशोक केनी यांना पंचाचार्य रत्न, पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष हभप गहणीनाथ औसेकर महाराज यांना विठ्ठल सेवा पुरस्कार, कलबुर्गीचे शरणबसवेश्‍वर विद्यावर्धक संघाच्या चेअर पर्सन डॉ.दाक्षायणी अव्वाजी यांना अक्कमहादेवी रत्न, उपमुख्यमंत्री एकनाि शिंदे यांचे स्वीयसहाय्यक मंगेश चिवटे यांना वीरशैव आरोग्य दूत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर वीरशैव समाजातील वीरशैव कक्कय्या समाजाचे अध्यक्ष सुधीर खरटमल, यांच्यासह कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातील मंत्री, आमदार, खासदार माजी आमदार खासदार विविध पदाधिकारी यांचा वीरशैवश्री या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला संपूर्ण देशभरातून वीरशैव बांधव उपस्थित होते.

    या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे अध्यक्ष कर्नाटक राज्याचे मंत्री ईश्‍वर खंडरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्‍वनाथ चाकोते, महिला अध्यक्षा उमा नाईक, मुंबई अध्यक्ष महेश मुद्दा, कर्नाटक प्रदेश अध्यक्ष शंकर बीद्री, तेलंगणा अध्यक्ष नेती महेश्‍वर, तामीळनाडूचे अध्यक्ष एस नागराथीनम, आंध्रप्रदेशचे अध्यक्ष दांडीना शिवानंद, केरळचे अध्यक्ष बीन के शंकर, महिला अध्यक्ष वीणा कश्यपनवर, उद्योग विभागाचे अध्यक्ष उमेश शिगोन, युवा अध्यक्ष व्यंकट रेड्डी पाटील, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष विश्‍वशंकर चाकोते, रोहिणी कल्याणी, गुणवंत पाटील, गुरूपादप्पा पदशेट्टी, प्रकाश गवळी, प्रविण संगोलगी, सुरेश पाटील, सुभाषप्पा बोंदरे, चंद्रकांत नागणसुरे, अनिल चौगुले, शिवराज शेटकर आदींनी परिश्रम घेतले..
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

विश्वकल्याण, पर्यावरण शुद्धी आणि समाधानकारक पावसासाठी मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार

Next Post

“माडरी मल्लय्यान ध्यान, आगीतू जन्मद पावन!” मंद्रूपमध्ये शिवभक्तीचे चैतन्य

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“माडरी मल्लय्यान ध्यान, आगीतू जन्मद पावन!” मंद्रूपमध्ये शिवभक्तीचे चैतन्य

"माडरी मल्लय्यान ध्यान, आगीतू जन्मद पावन!" मंद्रूपमध्ये शिवभक्तीचे चैतन्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांकडून चौकशी करण्यास  टाळाटाळ

दोन महिने उलटले तरी ‘औरादच्या सर्कल’ची पोलखोल होईना

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

132728

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697