Thursday, June 25, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

”मिथुन”च्या जादूमुळे ‘अदृश्य शक्ती’ गायब

भावाला 'मेंबर' बनविण्यासाठी मिथुन मुगळे यांचा 'करेक्ट कार्यक्रम'

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 10, 2026
in सोलापूर
0
”मिथुन”च्या जादूमुळे ‘अदृश्य शक्ती’ गायब
0
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मळसिध्द मुगळे यांच्या विजयात ‘मिथुन’ यांचा सिंहाचा वाटा

मंद्रूप….
चित्रपटांमध्ये अभिनेता ‘मिथुन चक्रवर्ती’ यांनी विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यामध्ये मिथुन यांचे डान्सर, जादूगार व नकलाकार अशा भूमिका सर्वांना परिचित आहे. मात्र मंद्रूपमधील मिथुन नावाच्या लहान भावाने मोठ्या भावाला पंचायत समिती ‘मेंबर’ करण्यासाठी कंबर कसून विरोधकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. पन्नास वर्षांहून अधिक काळ सत्ताधारी व प्रस्थापित असणार्‍या विरोधकांचा सुफडासाफ केला. भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांचे ‘अदृश्य शक्ती’ काम करीत असल्यामुळे लक्ष्मणरुपी मिथुन यांनी रामासमान भाऊ असणाऱ्या मळसिद्ध यांना ‘मेंबर’करण्याचा चंग बांधून मतदारांसमोर ‘कमळरूपी जादू’ केला. मिथुन यांनी हत्ती होऊन ताकत दाखविण्यापेक्षा मुंगी होऊन ताकतवान असलेल्या अदृश्य शक्तीला गायब केला. त्यामुळे मंद्रूप पंचायती समिती गणात पडद्यामागून काम करणाऱ्या मिथुन मुगळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मंद्रूप येथील पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मळसिद्ध मुगळे यांचा पराभव करण्यासाठी ‘अदृश्य शक्ती’ काम करीत असल्याचे निदर्शनास आले. बलाढ्य व ताकतवान अदृश्य शक्तीला दूर करण्यासाठी मिथुन यांनी व्यूहरचना आखली. मंद्रूप ,वांगी, वडकबाळ व बसवनगर येथे ‘डोकं’ चालवून ‘अदृश्य शक्ती’ला पराभूत केले . त्यामुळे मिथुनच्या जादूमुळे मंद्रूप मधील मळसिद्ध मुगळे यांना पराभूत करण्यासाठी आलेली अदृश्य शक्ती गायब झाली.
मळसिध्द व मिथुन हे दोघेही सखे भाऊ. मळसिद्ध मोठा तर मिथुन छोटा. मिथुन यांनी ‘यंदा ठरलंय’ म्हणत मोठ्या भावाला पंचायत समिती मेंबर करण्यासाठी चंग बांधला. त्यासाठी त्यांनी भावाला उमेदवारी मिळाल्यापासून प्रचाराची सर्व सूत्रे व यंत्रणा स्वताकडे घेतली . मित्रांच्या सहाय्याने पंचायत समिती गणात मतदारांपर्यंत कमळ चिन्ह पोहोचविले. मिथुन यांचे ‘मितभाषी’ व ‘सर्वसमावेशक’ स्वभाव. कधीही राजकारणात हस्तक्षेप नाही.  मात्र २०१७ च्या पंचायत समिती निवडणुकीत वहीनी संगीता मुगळे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागल्यामुळे त्यांच्या मनामध्ये शल्य होते . त्यामुळे मंद्रूप पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर झाल्यापासून त्यांनी मोठ्या भावाला ‘मेंबर’ करण्यासाठी प्रथमच निवडणुकीत सहभाग घेतला. १५ दिवस ‘दिवसाचे रात्र व रात्रीचे दिवस’ करून विजयासाठी चक्रे फिरविली. मात्र या निवडणूकीत भाजपच्या दोन आमदारांच्या गटबाजीचा ‘श्रेष्ठत्वा’च्या लढाईचा फटका भावाला बसण्याची चिन्हे दिसू लागली. आमदारांनी भाजपच्या नेत्यांवर ‘दबाव’ टाकून मळसिध्द यांचा प्रचार न करता पराभव करण्याचे ‘फर्मान’ सोडले. शिवाय भाजपचे विरोधक असणार्‍या राष्र्टवादीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ‘अर्थ’पूर्ण खेळ सुरू झाला. यावेळी मिथुन यांना भावाला पराभूत करण्यासाठी ‘अदृश्य शक्ती’ काम करीत असल्याचे लक्षात येताच ‘मित्रां’च्या सहायाने विजयाचे गणिते आखली. अस्तित्वाच्या लढाईत कोणत्याही परीस्थितीत माघार नाही , असा दृढनिश्चय करून मिथुन यांनी विरोधकांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली. मंद्रूपमध्ये ‘शेखर’ची अदृश्य शक्ती भेदण्यासाठी मिथुन यांनी लक्ष्मणरुपी ताकद धारण केले. त्यामुळे  रामासमान मोठे बंधु असणाऱ्या मळसिद्ध यांना पंचायत समिती ‘मेंबर’ करून मिथुन यांनी विरोधकांसह अदृश्य शक्तीचाही पराभव केला. मिथुनच्या प्रचाराच्या जादूमुळे मंद्रूपमधील विरोधकांना सहकार्य करणारी अदृश्य शक्ती गायब झाल्यामुळे व मळसिध्द मुगळे यांच्या विजयात सिंहाचा वाटा असणार्‍या मिथुन यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रामायणामध्ये रामाच्या विजयामागे लक्ष्मण होता, तसेच या राजकीय लढाईत मोठा भाऊ मळसिध्द यांच्या विजयामागे लहान भाऊ मिथुन खंबीरपणे उभा राहिला . त्यामुळे विजय मिळविणे शक्य झाल्याची चर्चा सुरू आहे. कलियुगातही मिथुनसारखा भाऊ हवा, असे म्हणावे लागेल.

Previous Post

अदृश्य शक्तीमुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’

Next Post

जिल्हा वार्षिक योजना मंजूर निधी 31 मार्चपूर्वी खर्च करा -पालकमंत्री जयकुमार गोरे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
जिल्हा वार्षिक योजना मंजूर निधी 31 मार्चपूर्वी खर्च करा -पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्हा वार्षिक योजना मंजूर निधी 31 मार्चपूर्वी खर्च करा -पालकमंत्री जयकुमार गोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक