Thursday, June 25, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

अदृश्य शक्तीमुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’

दक्षिणच्या मतदारांकठून विकासाला पसंती

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 10, 2026
in सोलापूर
0
हत्तूर जिल्हा परिषद गटात धनुष्यबाण चालणार
0
SHARES
399
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हत्तूर गट व भंडारकवठे गणात “धनुष्यबाण” जोराने चालला

दक्षिण सोलापूर…
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे पराभव करण्यासाठी व विरोधी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी “अदृश्य शक्ती” मोठ्या प्रमाणात काम करीत होती . याबाबत “नवभारत न्यूज पोर्टल”ने अंदाज ही व्यक्त केली होती. त्यानुसार अदृश्य शक्तीच्या मदतीने हत्तुर जिल्हा परिषद गटात व भंडारकवठे पंचायत समिती गणात भाजपचे उमेदवार पराभूत होऊन शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. या दोन्ही मतदारसंघात भाजपच्या “नाराज नेत्यांच्या अदृश्य शक्ती”ने धनुष्यबणाला साथ दिल्यामुळे भाजपच्या कमळाला धक्का बसला. त्यामुळे अदृश्य शक्तीची महिमा विरोधी पक्षाच्या उमेदवारांना कळाली . मंद्रूपच्या मतदारांनी अदृश्य शक्तीला नाकारून विकासासाठी “साहेबा”ला साथ दिल्याचे दिसून येते.

दक्षिण सोलापूर तालुक्यात उमेदवारी जाहीर करण्यापासून ते मतदानापर्यंत मोठ्या भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी दिसून आले. हत्तुर जिल्हा परिषद गटात माजी आमदार दिलीप माने व आमदार सचिन कल्याणशेट्टी गटाला उमेदवार जाहीर झाल्यानंतरही आमदार सुभाष देशमुख यांनी प्रतिष्ठा पणाला लावून या ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी दिली. मात्र इंदुमती अलगोंडा पाटील, बाजार समिती संचालक सुरेश हसापुरे व शिवानंद पाटील यांची उमेदवारी रद्द झाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती . त्यांनी उमेदवारी माघार घेतली. मात्र भाजपच्या उमेदवाराबरोबर प्रचार करताना त्यांचे कार्यकर्ते दिसले नाहीत. त्यामुळे हत्तुर जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या मातोश्री व माजी आमदार रतिकांत पाटील यांच्या पत्नी लक्ष्मीताई पाटील यांच्याकडून  आमदार देशमुख गटाच्या उज्वला हविनाळे यांना अवघ्या ३४ मतांनी पराभव पत्करावा लागला .या ठिकाणी अलगोंडा पाटील, हसापूरे व पाटील यांची “अदृश्य शक्ती ” काम केल्याचे दिसून येते. भंडारकवठे पंचायत समिती गणासाठी बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत कुपसंगे यांच्या भावजयी नेहा कुपसंगे यांना उमेदवारी मिळाली. कुपसंगे हे पूर्वाश्रमीचे माजी आमदार दिलीप माने यांचे समर्थक. मात्र ते आमदार देशमुख गटाकडून उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाले. या ठिकाणी प्रियांका कुबसंगे भाजपकडून इच्छुक होत्या. मूळच्या भंडारकवठेच्या व स्थायिक प्रियांका कुबसंगे यांना उमेदवारी डावलून सादेपूर येथील कुबसंगे यांना उमेदवारी देण्यात आली. जिल्हा परिषद पंचायत समिती गणात भंडारकवठे सारख्या मोठ्या गावाला उमेदवारी न मिळाल्याने स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती . त्यामुळे ही नाराजी “हेरून” माजी आमदार दिलीप माने व बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे यांनी भीमा नदीकाठावरील गावात हातात “धनुष्यबाण” धरला . त्यामुळे मतदानादिवशी भंडारकवठे पंचायत समिती गणात धनुष्यबाण सर्वत्र चालल्याचे दिसून येते. दक्षिण सोलापूर तालुक्यात भंडारकवठेच्या एकमेव गणामध्ये शिवसेनेने विजय मिळवून भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे या ठिकाणी माने व हसापूरे गटातील “कार्यकर्त्यांच्या” अदृश्य शक्तीमुळे भाजपच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागल्याचे दिसून येते. त्यामुळे अदृश्य शक्तीची किमया दक्षिण सोलापूर तालुक्याला परिचित झाल्याचे दिसून येते . मात्र या अदृश्य शक्तीमुळे भाजपला एक जिल्हा परिषद गट व एक पंचायत समिती गणात पराभव पत्करावे लागले.
मंद्रूप पंचायत समिती गणात भाजपचे उमेदवार मळसिद्ध मुगळे यांना पराभूत करण्यासाठी आमदार देशमुख गटाचे “स्वीय सहाय्यक” चार दिवस मंद्रूप मुक्कामी होते. त्यासाठी त्यांनी विरोधी गटाच्या व राष्ट्रवादीच्या उमेदवाराला “अर्थ”पूर्ण ताकद ही दिली. शिवाय मंद्रूपसह वांगी, वडकबाळ व बसवनगर येथील भाजपच्या नेत्यांवर दबाव आणून मुगळे यांच्या प्रचारात सहभागी न होण्याचे आवाहन केले. मात्र मंद्रूपच्या सत्ताधार्‍यांवरील नाराजी आणि सीना नदीच्या महापूरावेळी मुगळे यांनी केलेले सामाजिक कार्य याबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती होती. अफवा व अदृश्य शक्तीमुळे मुगळे यांचा पराभव निश्चित मानला जात असताना उमेदवार ‘मुगळे’नी कंबर कसून मतदारांना विनंती केली. गणाच्या विकासासाठी संधी देण्याची विनंती करीत ते मतदारांपर्यंत पोहोचले. त्यामुळे आमदार देशमुख गटाची “अदृश्य शक्ती” मात्र मंद्रूपच्या मतदारांनी धुडकावून लावल्याचे दिसून येते. त्यामुळे मंद्रूपमध्ये मुगळे यांनी प्रस्थापितांना धक्का देत तब्बल ४००० पेक्षा अधिक मताधिक्यांनी विजय मिळविला. मंद्रूपच्या राजकारणात कुणाचाही हस्तक्षेप सहन करणार नसल्याचे मतदारांनी  सिध्द केले. त्यामुळे मुगळे यांचा ऐतिहासिक विजय सत्ताधारी व आमदार देशमुख गटाला धक्का मानला जात आहे.

Previous Post

उमेदवारांचे देव पाण्यात

Next Post

”मिथुन”च्या जादूमुळे ‘अदृश्य शक्ती’ गायब

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
”मिथुन”च्या जादूमुळे ‘अदृश्य शक्ती’ गायब

''मिथुन''च्या जादूमुळे 'अदृश्य शक्ती' गायब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक