Thursday, June 25, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

उमेदवारांचे देव पाण्यात

दक्षाणमध्ये चुरशीने मतदान , निकालाविषयी उत्सुकता शिगेला

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 7, 2026
in सोलापूर
0
उमेदवारांचे देव पाण्यात

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 41;

0
SHARES
494
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिणमध्ये चुरशीने ६० टक्के मतदान

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

दक्षिण सोलापूर..
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी मतदान करताना मतदारांमध्ये निरूत्साह असल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत दक्षिण तालुक्यात केवळ ७ टक्केच मतदारांनी मतदान केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात मतदानाची टक्केवारी वाढली. त्यामुळे सायंकाळी ५.३० वाजता ६० टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. शेतमजूर कामावरून आल्यानंतर केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. त्यामुळे दुपारी ३.३० वाजता दक्षिणमध्ये ४३ टक्के मतदान झाल्याचे दिसून आले . त्यामुळे चुरशीने झालेल्या मतदानाचा टक्का कोणाला फायदेशीर ठरणार ? हे निकालादिवशी स्पष्ट होणार आहे. मात्र या निवडणूकीत भाजप व शिवसेनेमध्ये काॅंटे कि टक्कर दिसून आले. त्यामुळे निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. मतदान टक्केवारी वाढल्याने उमेदवार देव पाण्यात ठेऊन निकालाची प्रतीक्षा करीत आहेत.
नऊ वर्षानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक होत असल्याने दक्षिणमध्ये भाजप, शिवसेना , काॅंग्रेस व राष्र्टवादी काॅंग्रेसच्या उमेदवारांमध्ये चुरस दिसून आले. यावेळी मंद्रूप जिल्हा परिषद गटामधून भाजपचे सोनाली कडते व राष्र्टवादीच्या प्रीती कोरे, हत्तूर गटामध्ये भाजपच्या उज्वला हविनाळे व शिवसेनेच्या लक्ष्मीताई पाटील व भंडारकवठे गटामध्ये भाजपच्या सविता उंबरजे व काॅंग्रेसच्या रूपाताई कमळे यांच्यामध्ये चुरस दिसून आली.
मंद्रूप पंचायत समितीमध्ये भाजपचे मळसिध्द मुगळे व राष्र्टवादीचे अप्पाराव कोरे यांच्यातील लढत लक्षवेधी आहे. काॅंग्रेसचे अनंत म्हेत्रे यांनीही जोरदार टक्कर दिल्याने निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. कंदलगावमध्ये भाजपच्या प्रियांका आसबे व काॅंग्रेसच्या शांताबाई व्हनमाने, हत्तूरमध्ये भाजपचे पंचप्पा धनशेटी व शिवसेनेचे नरसप्पा दिंडोरे, औरादमध्ये भाजपचे संदिप टेळे व शिवसेनेचे प्रमोद शिंदे, भंडारकवठेमध्ये नेहा कुपसंगे व प्रियांका कुपसंगे, निंबर्गीमध्ये भाजपच्या दुपारगुडे व काॅंग्रेसच्या श्रृती गायगवळी यांच्यामध्ये चुरस दिसून आली.
यावेळी मतदान केंद्रामध्ये बदल झाल्यामुळे एकाच कुटुंबातील मतदारांची नावे विविध मतदान केंद्रामध्ये आल्याने मतदारांची धावपळ झाली . मतदान नावे शोधण्यासाठी व मतदान केंद्रासंदर्भात मदत करण्यासाठी बीएलओ पथकही कार्यरत होते. यावेळी झोनल अधिकार्‍यांनी मतदारांना मार्गदर्शन करण्याऐवजी जबाबदारी झटकल्याने अनेक ठिकाणी वाद झाल्याचे दिसून आले. मात्र दक्षिण तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली. मंद्रूप पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार व पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांच्यासह पोलीसांनी बंदोबस्त ठेवल्याने मतदान शांततेत पार पडला.

Previous Post

दक्षिणच्या निवडणूकीत “अदृश्य” शक्ती जोमात

Next Post

अदृश्य शक्तीमुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
हत्तूर जिल्हा परिषद गटात धनुष्यबाण चालणार

अदृश्य शक्तीमुळे 'कहीं खुशी, कहीं गम'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक