Thursday, June 25, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दक्षिणच्या निवडणूकीत “अदृश्य” शक्ती जोमात

आमदार गटाच्या उमेदवारांमध्ये चिंता

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 6, 2026
in सोलापूर
0
भाजपा उमेदवारांमध्ये ‘ सस्पेन्स ‘
0
SHARES
820
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘मालक’ व ‘साहेब’ गटाचे पडद्यामागून यंत्रणा सक्रीय

दक्षिण सोलापूर…
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जिरवाजिरवीच्या राजकारणात ‘अदृश्य’ शक्ती काम करीत असल्यामुळे उमेदवारांना विजयाची चिंता लागली आहे .
दक्षिण तालुक्यामध्ये उमेदवारी वाटपातील नाराजी उफाळून आली असून मालक व साहेब गट सक्रिय होऊन आमदार गटाच्या विरोधात काम करीत असल्याची चर्चा सुरू आहे. अदृश्य शक्ती सक्रिय झाल्यामुळे निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे .
माजी आमदार दिलीप माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या उमेदवार निवडीबाबत मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. एका जागेसाठी भाजपाचे दोन दोन एबी फाॅर्म देण्यात आले. त्यामुळे उमेदवारी मिळविताना चुरस दिसून आली. यावेळी हतुर जिल्हा परिषद गट व गणामध्ये माजी आमदार माने गटाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार देशमुख गट या ठिकाणी त्यांची उमेदवारी रद्द करून स्वतःच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाले. त्यामुळे या ठिकाणी “मालक” गट नाराज झाल्यामुळे आमदार गटाच्या विरोधात काम करताना दिसून येत आहे. त्यामुळे हतूर गटांमध्ये कमळापेक्षा “धनुष्यबाण” जोरदार चालत आहे . याशिवाय मंद्रूप व भंडारकवठे जिल्हा परिषद गटातही “मालक” व “साहेब” गट भाजपा उमेदवाराच्या विरोधात सक्रिय झाल्यामुळे मतदारांपर्यंत  विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे चिन्ह पोहोचल्याचे दिसून येत आहे. आमदार गटाच्या उमेदवारांचे पराभव करण्यासाठी मालक व साहेब गट काम करीत आहे. दोन दिवसात ” मालक” गटाकडून प्रत्येक कार्यकर्त्यांना आमदार गटाच्या उमेदवाराच्या विरोधात काम करण्याचे “फर्मान” निघाल्याचे सांगण्यात येत आहे. तर “साहेब” गटाकडूनही आमदार गटाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करण्याचे आदेश मिळाल्याची चर्चा सुरू आहे . त्यामुळे आमदार गटाचे उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून गटबाजीमुळे भाजपा उमेदवाराच्या विजयात अडसर निर्माण होत आहे . अंतर्गत गटबाजीमुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मालक व साहेब गटाच्या कार्यकर्त्यांकडून आमदार गटाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात येत असल्यामुळे त्याचे मतदानात कितपत रूपांतर होणार ? हे नऊ फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहे. मात्र दक्षिणमध्ये आमदार गटाविरोधात मालक व साहेब गट प्रचार यंत्रणेमध्ये सक्रिय झाल्याची चर्चा सुरू आहे . त्यांच्या फर्मानानुसार कार्यकर्त्यांकडून प्रचार झाले तर भाजपा उमेदवारांच्या मतदानामध्ये घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या हत्तूर गटाप्रमाणे मंद्रूप पंचायत समिती गणात मळसिध्द मुगळे यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला आमदार गटाकडून विरोध असूनही ते उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाल्याने आमदार गटामध्ये नाराजी पसरल्याचे दिसून येते. त्यामुळे मंद्रूप गणात मुगळे यांच्या पराभवासाठी ‘शेखर ‘अदृश्य’ शक्ती मंद्रूपमध्ये मुक्कामी राहून सक्रीय झाली आहे. त्यामुळे मालक व साहेब गटाचे कार्यकर्ते अदृश्य शक्तिविरोधात मुगळे यांच्या बाजूने प्रचारात दिसून आले. त्यामुळे मंद्रूप गणात त्या अृदश्य शक्तीविरोधात जनमत असल्याचे दिसून येताच कार्यकर्ते ‘शेतशिवारात’ दिसून येत आहेत. याठिकाणी राष्र्टवादी काॅंग्रेसच्या उमेदवाराला अदृश्य शक्ती मदत करीत असल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
भंडारकवठेतही कमळावर नाराज होऊन मालक गटाकडून “धनुष्यबाण” चालविण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक उमेदवारीच्या मुद्यावरून मतदारांचा “बाण” चालल्यास अदृश्य शक्ती यशस्वी झाल्याचे सिध्द होईल. त्यामुळे अदृश्य शक्तीचा फटका कोणाला बसणार ?आणि कोणाला फायदेशीर ठरणार ? हे सोमवारी 9 फेब्रुवारी स्पष्ट होणार आहे.

Previous Post

दोन दिवस शाळांना सुट्टी

Next Post

उमेदवारांचे देव पाण्यात

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
उमेदवारांचे देव पाण्यात

उमेदवारांचे देव पाण्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक