Wednesday, June 24, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा होणार गौरव

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 12, 2026
in सोलापूर
0
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा होणार गौरव
0
SHARES
138
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सोलापूर :- इतर मागास विकास विभागांतर्गत कार्यरत इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्या मार्फत शासन निर्णय व शुध्दीपत्रकान्वये विभागांतर्गत स्थापना करण्यात आलेल्या विविध पुरस्कारांसाठी पात्र व इच्छुक व्यक्ती तसेच समाजाच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.सोलापूर जिल्ह्यातील समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक क्षेत्रातील उत्थानासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना खालील पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करता येणार आहेत . तरी इच्छुकांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक गणेश सोनटक्के यांनी केले आहे.

1. महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार
2. नटराज पुरस्कार
3. विश्वकर्मा पुरस्कार
4. क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार

अटी व शर्ती :
– अर्जदार व्यक्ती/संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक.
– समाजाच्या उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय कार्य केलेले असावे.
– अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक.
– अपूर्ण अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.
– अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल.

प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी 2026 असून, अर्ज सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सात रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, चौथा मजला, सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्जाचा नमुना व अधिक माहिती संबंधित कार्यालयात उपलब्ध आहे.
पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक गणेश सोनटक्के यांनी केले आहे.

Previous Post

जिल्हा वार्षिक योजना मंजूर निधी 31 मार्चपूर्वी खर्च करा -पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

दिल्लीत गोभक्त उमा बिराजदार यांचे सन्मान

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दिल्लीत गोभक्त उमा बिराजदार यांचे सन्मान

दिल्लीत गोभक्त उमा बिराजदार यांचे सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक