Tuesday, June 23, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

त्या तोतया विद्यार्थ्यांवर होणार कारवाई

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 21, 2026
in सोलापूर
0
त्या तोतया विद्यार्थ्यांवर होणार कारवाई
0
SHARES
208
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दहावी मराठी पेपरला १२४९ विद्यार्थ्यांची दांडी

 
सोलापूर…
आज २० फेब्रुवारीपासून राज्य शालांत दहावी परीक्षा सुरू झाले आहेत. शासनाने काॅपीमुक्त अभियान राबवून सीसीटीव्ही, सरमिसळ विद्यार्थी बैठक व्यवस्था व ड्रोनद्वारे परीक्षा केंद्रावर निरीक्षण यामुळे काॅपीला आळा बसला आहे. मात्र मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर परीक्षा केंद्रावर दहा तोतया परीक्षार्थी आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यवेक्षक व केंद्रसंचालक यांच्या हाॅल तिकीट तपासणीमुळे तोतया परीक्षार्थी असल्याचे दिसून आले. दहा वर्गखोल्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे एक एक बोगस तोतया विद्यार्थी परीक्षेला बसले होते. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी तोतया परीक्षार्थींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दहावीच्या मराठी पेपरला १२४९ परीक्षार्थींनी दांडी मारली .

शुक्रवार २० फेब्रुवारीपासून दहावी परीक्षेला सुरूवात झाली असून सर्वच केंद्रावर काॅपीमुक्त परीक्षा पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दोन वर्षापासून शासनाकडून काॅपीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही, परीक्षा केंद्र परीसरात ड्रोनद्वारे पाहणी, विद्यार्थी यांची सरमिसळ बैठक व्यवस्था यासह बैठे भरारी पथक व दक्षता पथकाद्वारे काॅपीप्रकार आढळून आले नाही. मराठी विषयाचा पेपर असतानाही जिल्ह्यातील १५ परीक्षा केंदांवर १२४९ परीक्षार्थी गैरहजर राहीले आहेत.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडून परीक्षेतील काॅपी प्रकार बंद करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आले आहेत. यामुळे हुशार व गुणवान विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

दक्षिणिमधील पाणीटंचाई दूर होणार

Next Post

धनश्रीच्या धैर्याला सलाम !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
धनश्रीच्या धैर्याला सलाम !

धनश्रीच्या धैर्याला सलाम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक