Tuesday, June 23, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सोलापूर विद्यापीठात जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते कला संकुलाचे उद्घाटन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 21, 2026
in सोलापूर
0
सोलापूर विद्यापीठात जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते कला संकुलाचे उद्घाटन
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनस्तरावर विशेष सहकार्य :जिल्हाधिकारी आशीर्वाद

सोलापूर… पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे सोलापूर जिल्ह्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे ज्ञानकेंद्र असून विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तसेच विविध विकासात्मक प्रस्तावांसाठी शासन स्तरावरून विशेष सहकार्य केले जाईल, अशी ठाम ग्वाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.शनिवारी, विद्यापीठ परिसरात पीएम उषा (PM-USHA) विभागाच्या मंजूर निधीतून उभारण्यात येणाऱ्या कला व ललित कला संकुल आणि जीव विज्ञान संकुल या दोन अत्याधुनिक इमारतींचे भूमिपूजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अधिसभा सदस्य ॲड. मल्लिनाथ शहाबादे, डॉ. वीरभद्र दंडे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. महादेव खराडे, अभियंता गिरीश कुलकर्णी, प्रल्हाद कांबळे, डॉ. गौतम कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पीएम उषा विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कुलगुरू डॉ. महानवर यांनी विद्यापीठाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आणि विकासात्मक प्रस्तावांबाबत सविस्तर माहिती दिली आहे. विशेषतः पंढरपूर येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वारकरी संशोधन केंद्राबाबत सखोल चर्चा झाली असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांबाबतही सकारात्मक भूमिका घेतली जाईल. या दोन्ही प्रमुख विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्वतः चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विद्यापीठाला नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले की, पीएम उषा अंतर्गत मंजूर निधीमुळे विद्यापीठात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. कला, ललित कला आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांत संशोधन व कौशल्याधारित शिक्षणाला नवे बळ मिळणार आहे. विद्यापीठात विविध विकासकामे प्रगतीपथावर असून त्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे वेळोवेळी मोलाचे सहकार्य लाभत आहे. यापुढेही त्यांनी विद्यापीठाच्या विकासाकडे विशेष लक्ष देऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा कुलगुरूंनी व्यक्त केली. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

धनश्रीच्या धैर्याला सलाम !

Next Post

सरपंचांना सहा महिन्यांची लाॅटरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सरपंचांना सहा महिन्यांची लाॅटरी

सरपंचांना सहा महिन्यांची लाॅटरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक