Tuesday, June 23, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सरपंचांना सहा महिन्यांची लाॅटरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 21, 2026
in सोलापूर
0
सरपंचांना सहा महिन्यांची लाॅटरी
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुदत संपलेल्या सरपंचांची सहा महिन्यासाठी प्रशासकपदी नेमणूक

सोलापूर… राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका मुदतीत होणार नसल्यामुळे ग्रामविकास मंत्रालयाने मुदत संपलेल्या सरपंचांची सहा महिन्यासाठी प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी घेतला आहे . तसेच गावच्या विकासासाठी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची प्रशासकीय समिती म्हणून नेमणूक करण्याचे आदेशही देण्यात आली आहे .त्यामुळे मुदत संपलेल्या सरपंचांना विकास कामे करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याने त्यांना सहा महिन्यांची लॉटरी लागली आहे .
राज्य सरपंच परिषदेने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. यासाठी प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, उपाध्यक्ष अॅड. विकास जाधव, जिल्हाध्यक्ष आदीनाथ देशमुख व माजी जिल्हाध्यक्षा कविता घोडके पाटील यांनी पाठपुरावा केले होते. त्याची दखल घेऊन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी राज्यातील मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सहा महिने निवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट झाली आहे. शिवाय या सहा महिन्याच्या काळात विकास कामे प्रलंबित राहू नये म्हणून सरपंचांनाच प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामविकास मंत्रालयाने घेतल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे . या निर्णयामुळे मुदत संपलेल्या सरपंचांना कारभारी म्हणून सहा महिन्यांचे अधिक कालावधीची लॉटरी लागली आहे.

….

विकासकामे प्रलंबित राहणार नाहीत
…
राज्य सरपंच परीषदेने राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मुदतवाढ संपलेल्या सरपंचांना प्रशासक म्हणून नेमणूक होण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे  यांच्या निर्णयामुळे सरपंच यांना प्रशासक म्हणून सहा महिन्यांची मुदत मिळाली आहे. यामुळे गावातील विकासकामे प्रलंबित राहणार नाहीत.

शिवानंद बंडे, नांदणी सरपंच तथा तालुका समन्वयक, राज्य सरपंच परिषद

__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

सोलापूर विद्यापीठात जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते कला संकुलाचे उद्घाटन

Next Post

सोलापूरच्या आयटी पार्कसाठी महत्वपूर्ण निर्णय

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सोलापूरच्या आयटी पार्कसाठी महत्वपूर्ण निर्णय

सोलापूरच्या आयटी पार्कसाठी महत्वपूर्ण निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक