Tuesday, June 23, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सोलापूरच्या आयटी पार्कसाठी महत्वपूर्ण निर्णय

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 21, 2026
in सोलापूर
0
सोलापूरच्या आयटी पार्कसाठी महत्वपूर्ण निर्णय
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती

सोलापूर ..
सोलापूरच्या आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सोलापुरात आयटी पार्क सुरू करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे तसेच इतर लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरला आयटी पार्क करणार असल्याचा शब्द सोलापूरकरांना दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पूर्ण होण्याकडे या निर्णयामुळे एक पाऊल पुढे पडले आहे. या निर्णयामुळे आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
पालकमंत्री श्री. गोरे म्हणाले, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यानंतर आयटी पार्कच्या उभारणीला वेग येणार आहे. सोलापूरच्या जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदानरुपी आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दानुसार आयटी पार्कच्या उभारणीला आता वेग येणार आहे.

सोलापूरच्या वस्त्रोद्योग व्यवसायाला इचलकरंजीच्या धर्तीवर सवलती देण्यासाठी आगामी अधिवेशनात बैठक लावण्यात येणार आहे. सोलापूरची विमानसेवा, समांतर जलवाहिनी ही कामे पूर्ण झाली आहेत. तसेच आगामी काळात अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठीची कामेही लवकरच सुरू होणार आहेत, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी सांगितले.

Previous Post

सरपंचांना सहा महिन्यांची लाॅटरी

Next Post

शेतकर्‍यांसाठी विविध पुरस्कार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
शेतकर्‍यांसाठी विविध पुरस्कार

शेतकर्‍यांसाठी विविध पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक