Sunday, June 21, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

लखपती दीदी बनवण्यासाठी ‘उमेद’माध्यम ठरणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 1, 2026
in सोलापूर
0
लखपती दीदी बनवण्यासाठी ‘उमेद’माध्यम ठरणार
0
SHARES
162
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रुक्मिणी महोत्सव व मिनी सरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन महोत्सवाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

सोलापूर :-
राज्यातील सर्व महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. उमेदच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या माध्यमातून सर्व महिलांना लखपती दीदी बनवण्याची ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज्यमंत्री चा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. नॉर्थ कोर्ट मैदान येथे ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आयोजित रुक्मिणी महोत्सव व मिनी सरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबसे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा परिषद सदस्य चेतन केदार ,नगरसेविका रोहिणी तडवळकर, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत जगताप आदी उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे म्हणाले की, महिला बचत गटांनी स्वतः उत्पादित केलेल्या मालांचे वस्तूचे विक्री व प्रदर्शन करण्यासाठी हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून हा मिनी सरस जिल्हा रुक्मिणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महिलांची आर्थिक बळकटी व सक्षमीकरणासाठी हा महोत्सव घेण्यात येतो. उमेद च्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या, त्यांना मानाने, सन्मानाने जगता यावे त्यांना मानाचे स्थान मिळावे यासाठी उमेदच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात, असे त्यांनी सांगितले.
तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून नवनवीन मोठे उद्योग महिलांनी निर्माण करावे, तसेच प्रत्येक गावागावांमधून महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक गावी एक प्रभाग संघ निर्माण व्हावे अशी भूमिका ठेवून आपण सर्वांनी काम करावे. गावातील दूध व्यवसाय करणाऱ्या महिलांनी स्वतःची दूध बँक तयार करावी. शेळ्या, मेंढ्या व गाई पालन हा व्यवसाय सर्वात जास्त पैसा मिळवून देणारा ग्रामीण भागातील व्यवसाय आहे. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाला चांगले पॅकिंग केले तर चांगला पैसा मिळतो. महिलांच्या उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी उमेद मॉल मंजूर केला गेला आहे, अशी ही माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली. उमेद मॉल मुळे सोलापूर जिल्ह्यातील महिलां च्या उत्पादित वस्तूंसाठी बारा महिने हक्काची बाजारपेठ मिळणार आहे .
महिला स्वयंसहायता समूहांना समुदायिक गुंतवणूक निधी 32 कोटी 9 लाख 40 हजार रुपये चा धनादेश देण्यात आला, तसेच महिला स्वयं सहायता समूह बँक कर्जवाटप 2 कोटी 25 लाख रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला.
या महोत्सवात महिला बचत गटांचे 80 स्टॉल लागलेले आहेत.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

शासकीय कार्यालये व स्मशानभूमी चकाचक

Next Post

नातेवाईक इराण किंवा इराकमध्ये वास्तव्यास असल्यास येथे संपर्क साधा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
नातेवाईक इराण किंवा इराकमध्ये वास्तव्यास असल्यास येथे संपर्क साधा

नातेवाईक इराण किंवा इराकमध्ये वास्तव्यास असल्यास येथे संपर्क साधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

108908

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697