Sunday, June 21, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

शासकीय कार्यालये व स्मशानभूमी चकाचक

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 1, 2026
in सोलापूर
0
शासकीय कार्यालये व स्मशानभूमी चकाचक
0
SHARES
115
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अडीच हजार श्री सदस्यांनी केली स्वच्छता

सोलापूर :

रविवारी शासकीय सुट्टीचा दिवस असतानाही सोलापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालये व स्मशानभूमीमध्ये सुमारे अडीच हजार श्री सदस्यांनी एकाचवेळी सकाळी सात ते दहा या वेळेत स्वच्छता मोहिम घेतली. यामुळे शहरातील प्रमुख शासकीय कार्यालये व स्माशनभूमीचा परिसर स्वच्छ व सुंदर दिसून आला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यावतीने १ मार्च २०२६ रोजी सोलापूरात ही मोहिम घेण्यात आली. पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त स्वच्छता अभियान घेण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गतच सोलापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सर्व समाजाच्या स्मशानभूमी आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आली. यामध्ये सोलापूर शहर व परिसरातील जवळपास २५ ठिकाणी स्वच्छता मोहीम श्री सदस्यांकडून करण्यात आली.

या अभियानात प्रतिष्ठानच्या वतीने एकूण ६३ वाहनांतून कचरा गोळा करुन त्याची महापालिका प्रशासनाच्या साहयाने विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी ३५ ट्रॉली, १२ छोटा हत्ती, ४ टेम्पो, ७ डंपर, ३ अॅपेच्या माध्यमातून कचरा संकलीत करण्यात आला.

यावेळी शहर व शहर परिसरातील समर्थ बैठकीतील सदस्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. यासाठी सदस्यांनीच झाडू फावडे, टिकाव, टोपली आदी साहित्य आणले होते. हॅन्डगोल्ज व मास्क परिधान करुन यावेळी सदस्यांनी सर्वत्र स्वच्छता केली. शासकीय कार्यालयात गेल्या कित्येक वर्षापासून अडगळीत असलेला मोठा कचरा यावेळी सदस्यांनी कशाचीही तमा न बाळगता केवळ काही तासात गोळा केला. त्यामुळे सोलापूरकरांतून या अभियानाचे सर्वत्र कौतुक होत आहे

…..

चौकट
…..
स्वयंशिस्त सदस्यांनी केला शांततेत कार्यक्रम
….
स्वच्छता अभियान म्हणलं की अनेकदा कामापेक्षा गाजावाजाच जास्त होत असल्याचे दिसुन येते. रविवारी शहरात राबविण्यात आलेल्या अत्यंत व्यापक स्वरुपाच्या स्च्छता अभियानात मात्र कोठेही गाजावाजा दिसून आला नाही. ना आरडाओरडी, ना भोसकीभोसकी ना फोटोसेशन अशा अवस्थेत सदस्यांनी यावेळी अत्यंत शांततेत स्वच्छतेचा कार्यक्रम यशस्वी केला .

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Next Post

लखपती दीदी बनवण्यासाठी ‘उमेद’माध्यम ठरणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
लखपती दीदी बनवण्यासाठी ‘उमेद’माध्यम ठरणार

लखपती दीदी बनवण्यासाठी 'उमेद'माध्यम ठरणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक