Saturday, June 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

तात्या विंचू आणि गोरिला मंद्रूपमध्ये !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 19, 2026
in सोलापूर
0
तात्या विंचू आणि गोरिला मंद्रूपमध्ये !
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एक एप्रिल पासून मंद्रूपच्या मल्लिकार्जुन यात्रेस सुरुवात 

दोन जगद्गुरूंच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

मंद्रूप… येथील ग्रामदैवत श्री कपिलसिध्द मल्लिकार्जुन यात्रेस बुधवार एक एप्रिल पासून सुरुवात होणार असून रविवार 5 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आली आहेत. यंदा सोलापूर तात्या विंचू आणि गोरिला हे यात्रेचे प्रमुख आकर्षण असल्याचे यात्रा कमिटी कडून सांगण्यात आले.
बुधवार एक एप्रिल रोजी ‘श्रीं’चे कावड पालखी समवेत नंदीध्वजांचे देवालयात प्रवेश , दुपारी चार वाजता सर्व देवांना तैलाभिषेक, गुरुवार दोन एप्रिल रोजी ‘श्री’स नैवेद्य , दुपारी दोन वाजता उज्जैनीचे जगद्गुरु डॉ. सिध्दलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी व काशीचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे आगमन , दुपारी चार ते आठ वाजेपर्यंत जगद्गुरूंच्या समवेत ‘श्रीं’ची पालखी, सदरबाशिंग व नंदी ध्वज यांची सवाद्य मिरवणूक, त्यानंतर मल्लिकार्जून देवालयात कल्याणमहोत्सव व धर्मसभा होणार आहे. रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम.


शुक्रवार तीन एप्रिल रोजी पहाटे चार वाजता ‘श्री’स रुद्राभिषेक , नंदीध्वज व पालखी समवेत गावातून मिरवणूक, रात्री दहा वाजता झळकी येथील श्री बिरलिंगेश्वर नाट्यसंघ यांचे म्हाळींगेश्वर महात्मे अर्थात गुरुशिष्यर महिमे या कन्नड सामाजिक नाटकाचे आयोजन करण्यात आला आहे. शनिवार चार एप्रिल रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत ढोळ्ळावरील गाण्यांचा कार्यक्रम, दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आला आहे. रात्री नऊ वाजता बागलकोट येथील रचो मेलोडी कन्नड गीतांचा आर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे.
रविवार पाच एप्रिल रोजी सकाळी ‘श्री’ चे कावड व नंदीध्वज यांचे वाजत गाजत मानकरांच्या घरी आगमन होणार आहे. यात्रा कालावधीत अनेक भक्तांकडून दररोज महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे . तसेच मल्लिकार्जुन देवालय परिसरात भव्य जनावर प्रदर्शन व बाजाराचे आयोजन करण्यात आला आहे. यावेळी उत्कृष्ट जनावर व आदर्श पशूपालकांना बक्षीस देण्यात येणार आहे. तरी भाविक व पशुपालकांनी यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन यात्रा कमिटी कडून करण्यात आला आहे.
….
सोलापूर तात्या विंचू आणि गोरिला यंदाचे आकर्षण
…
श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रेत दरवर्षी नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गत दोन वर्षात महाकाल नृत्यांचे आयोजन करण्यात आले होते . तर यावर्षी सोलापूर येथील सोलापूर तात्या विंचू आणि गोरिला हा कार्यक्रम यात्रेचे प्रमुख आकर्षण असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी दोन एप्रिल रोजी दुपारी तीन ते सहा यावेळी या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

अक्कलकोट गटशिक्षण अधिकारीवर कारवाई होईपर्यंत उपोषणावर सुरूच राहणार

Next Post

सांगलीमध्ये ‘मिशन लोटसला’ धक्का , मविआकडून महायुतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सांगलीमध्ये ‘मिशन लोटसला’ धक्का , मविआकडून महायुतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

सांगलीमध्ये 'मिशन लोटसला' धक्का , मविआकडून महायुतीचा 'करेक्ट कार्यक्रम'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक