अक्कलकोट गटशिक्षण अधिकारी विरोधात शिक्षकाचे उपोषण
सोलापूर… शिक्षकांची बदली व प्रतिनियुक्ती करण्याचा अधिकार नसताना विभागीय आयुक्तांचे अधिकार वापरून अक्कलकोटचे गटशिक्षण अधिकारी प्रशांत अरबाळे यांनी अक्कलकोट तालुक्यातील २५ शिक्षकांची बदली केली आहे. तसेच गटशिक्षण अधिकारी विरोधात अनेक महिला शिक्षिकांनी तक्रार करूनही प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख व झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी गटशिक्षण अधिकारी अरबाळे यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. तरी नूतन जिल्हा परीषद अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी तक्रारींची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांनी केली आहे . प्रशासनाकडून कारवाईसाठी दुर्लक्ष होत असल्याने मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांनी २३ फेब्रुवारीपासून जिल्हा परीषद पूनम गेटसमोर उपोषण सुरू केला आहे. त्यामुळे २५ दिवसानंतरही सिईओ कुलदीप जंगम व शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी अरबाळे यांच्यावर कारवाई न केल्याने शिक्षकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. . या निर्णयाविरोधात कट्टीमनी यांनी झेडपीचे सीईओ व शिक्षणधिकारी यांच्याकडे तक्रार करून न्याय देण्याची विनंती केली आहे . मात्र प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही. तसेच चुकीची माहीती देऊन गटशिक्षणाधिकारी अरबाळे एमपीएससी परीक्षेद्वारे उपशिक्षण अधिकारी परीक्षा उत्तीर्ण झाले. याबाबत मागासवर्गीय शिक्षक संघटनेने तक्रार केल्यानंतर यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले. शासनाला चुकीची माहीती देणारे गटशिक्षणाधिकारी अरबाळे बदलीमध्ये शिक्षकांना न्याय कसे देणार ? असा सवाल करीत तक्रार करण्यात आला आहे. अक्कलकोटच्या गटशिक्षणाधिकार्या विरोधात अनेक तक्रारी असतानाही सीईओ व शिक्षणाधिकारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून अरबाळे यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे तक्रारदारांवर अन्याय होत असल्याने कट्टीमनी यांनी २३ फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केला आहे. १८ मार्चपर्यंत प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याने कट्टीमनी यांनी अरबाळे यांच्यावर कारवाई होईपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले.









