Saturday, June 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’साठी मंद्रूपचे चिमुकले हरिपाठ, कीर्तनात

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 19, 2026
in सोलापूर
0
‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’साठी मंद्रूपचे चिमुकले हरिपाठ, कीर्तनात
0
SHARES
126
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अखंड हरिनाम सप्ताह, शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण सुरु

सोलापूर….. कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा सर्वत्र बोलबाला आहे. पण, सोलापूर शहरालगतच्या मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील चिमुकले दररोज हरिपाठ, भजन, किर्तन करीत ‘अध्यात्मिक इंटीलिजन्स’ वाढवत आहे. युवकांच्या पुढाकारातून ‘गुढी पाडवा’ पासून अखंड हरिनाम सप्ताह, शिवलिलामृत ग्रंथाचे पारायण सुरु आहे. सप्ताहाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.

विधायक कृतीशिलता, एकात्मता वाढवण्याच्या उद्देशाने जय हनुमान भजनी मंडळाने गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, शिवलिलामृत ग्रंथ पारायण, स्वच्छता मोहिम राबवण्याचा निर्धार केला. त्यास ज्येष्ठ मंडळींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पाच वर्षांपासून गुढी पाडवा पासून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरवात होते. पाच वर्षांमध्ये नगर, पुणे, मराठवाड्यातील अनेक नामांकीत कीर्तनकार मंद्रूपमध्ये आले होते. यंदाच्या वर्षी प्रसिद्ध कीर्तनकार ‘किर्तनसेवा’ होणार आहे.
सप्ताह निमित्ताने भाविकांसाठी दररोज महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे. तसेच, उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा दूर व्हावा, यासाठी शनिवारी (दि.२१) रक्तदान शिबीर आयोजिले आहे. सोमवारी (दि. २३) सकाळी गावातून ग्रंथाची नगरप्रदक्षिणा दिंडी काढण्यात येणार आहे, अशी माहिती, अध्यक्ष सुभाष वाघमोडे व सुनील लाड यांनी दिली.

https://navprabhatnews.com/wp-content/uploads/2026/03/VID-20260319-WA0055.mp4

——-
गावातील चिमुकले हरिपाठ, भजनामध्ये तल्लीन कोविड नंतर लहान मुलांमध्ये मोबाईलाचा वापर जास्त वाढला. त्यापासून चिमुकल्यांना परावृत्त करण्यासाठी जय हनुमान भजनी मंडळाने पुढाकार घेत, दररोज सायंकाळी दीड तास हरिपाठ सुरु केला. सुरवातीला चार-दोन मुलं हरिपाठसाठी येत होती. हळूहळू त्याचा मोबाईल कमी झालेला वापर, हरिपाठातील ओवी गुणगुण असल्याचे पाहून इतर पालकांनी त्यांच्या मुलांना हरिपाठाला जाण्यासाठी प्रोत्साहित केले. मागील एक-दीड वर्षभरापासून ४० ते ५० चिमुकले दररोज हरिपाठ, भजन-साठी मधला मारुती मंदिरात येतात. जय हनुमान भजनी मंडळाच्या पुढाकारामुळे लहान मुलांना हरिपाठ, संतांचे भजन, गौळण म्हणण्याची गोडी लागली आहे. ‘एआय’च्या काळामध्ये गावातील चिमुकले स्वत:चे ‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’ वाढवत आहेत. यासाठी बबन देशमाने, आेंकार झेंडेकर, सुरेश देशमुख, संजय केमकर, विनायक कोरे, आबा मोटे, मुकेश देविदास यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.


——
या महाराज मंडळींची किर्तन सेवा

….
अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने १९ ते २२ दरम्यान मधला मारुती मंदिरात होणाऱ्या सप्ताहमध्ये वारकरी संप्रदायातील मान्यवरांची मांदियाळी असेल. अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे, जिल्हाध्यक्ष संजय महाराज पाटील, सुनेश नाईकवाडे महाराज (बीड), दत्तात्रय क्षीरसागर महाराज (उळे), ज्ञानेश्वरी घाडगे महाराज (अकलूज), संस्कार खंडागळे महाराज (पंढरपूर) यांचे किर्तन होईल. वैष्णवी भगरे (अकोले), भीमा भोसले (कामती), बाळू पवार (गुंजेगाव), दशरथ खरात (मंद्रूप) यांचे प्रवचन होणार आहे.

…,

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

सांगलीमध्ये ‘मिशन लोटसला’ धक्का , मविआकडून महायुतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

Next Post

“या” गावात नववर्षाच्या स्वागताला ‘गुळ’ वाटण्याची प्रथा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“या” गावात नववर्षाच्या स्वागताला ‘गुळ’ वाटण्याची प्रथा

"या" गावात नववर्षाच्या स्वागताला 'गुळ' वाटण्याची प्रथा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक