Saturday, June 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“या” गावात नववर्षाच्या स्वागताला ‘गुळ’ वाटण्याची प्रथा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 19, 2026
in सोलापूर
0
“या” गावात नववर्षाच्या स्वागताला ‘गुळ’ वाटण्याची प्रथा

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 36;

0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवस फोडण्यासाठी भाविकांकडून शेकडो नारळ फोडण्याची प्रथा

मंद्रूप…

नवीन वर्ष व गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मंद्रूप मध्ये  गुळ वाटण्याची प्रथा आहे . शेकडो वर्षापासून गुढीपाडव्याचे मुहूर्त साधून मंद्रूप मधील भाविक मळसिध्द मंदिर येथे हजारो भाविकांना गुळ वाटप करून नवीन वर्षाचे स्वागत करतात . तसेच नवस फेडण्यासाठी मळसिध्द मंदिराच्या पायरीवर शेकडो नारळ “सीडकाई” फोडून नवस पूर्णही करतात . त्यामुळे मळसिध्द मंदिरात दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुळ वाटण्याची व नारळ फोडण्याची अनोखी प्रथा वर्षानुवर्षे सुरू असल्याचे दिसून येते. यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या दिवसाचे औचित्य साधून मंद्रूप मधील हिंदू भाविक मळसिद्ध मंदिर येथे देवाचे दर्शन घेऊन उपस्थितांना गोड म्हणून गुळ वाटप करतात . नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुळाला महत्त्व आहे . गुढीपाडव्यापासून उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे व शरीरामध्ये कॅल्शियमचे कमी होणारे प्रमाण भरून काढण्यासाठी गुळ वाटण्याची प्रथा आयुर्वेदीय कारण असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मळसिध्द मंदिरात येणाऱ्या शेकडो भाविकांकडून दोन किलो पासून ते पंचवीस किलोपर्यंत गुळ वाटप करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येते. तसेच नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून मंदिरात नवस केलेल्या भक्तांकडून पायरीवर शेकडो नारळ फोडून नवस पूर्ण करण्यात येते. यावेळी पाच नारळापासून ते २५१ पर्यंत नारळ फोडण्यात येते. त्यामुळे नवस पूर्ण केल्याचा समाधानही भाविकांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. एकूणच उन्हाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला व नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर गुळ वाटप करून आनंद साजरा करण्याचा ही प्रथा आहे असल्याचे येथील पुजारी सांगतात. शिवाय नवस फोडण्यासाठी श्रीफळ नारळचा वापरही केला जात असल्यामुळे परिसरातील व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळते.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’साठी मंद्रूपचे चिमुकले हरिपाठ, कीर्तनात

Next Post

दक्षिणच्या सभापतीकडून नागरीकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दक्षिणच्या सभापतीकडून नागरीकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य

दक्षिणच्या सभापतीकडून नागरीकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक