Friday, June 19, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

२८ व २९ मार्चला सोलापूरमध्ये महिला महाराष्र्ट केसरी कुस्ती स्पर्धा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 26, 2026
in सोलापूर
0
२८ व २९ मार्चला सोलापूरमध्ये महिला महाराष्र्ट केसरी कुस्ती स्पर्धा
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 प्रत्येक गटातील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस !

सोलापूर –  – सोलापूर येथे निर्झरा केअर फाऊंडेशनतर्फे २८ आणि २९ मार्चला आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या कुस्तीपटूला ‘महाराष्ट्र केसरी’ किताब, मानाची गदा आणि किया सोनेट कार देऊन गौरविण्यात येणार आहे, तर उपविजेत्या कुस्तीपटूला बुलेट दुचाकी दिली जाईल. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहात चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त रविवारी वासा पूजन समारंभ व माती पूजन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात कल्याणशेट्टी यांच्या हस्ते महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्याला देण्यात येणाऱ्या बक्षिसांचे अनावरण करण्यात आले.
मॅटवर होणाऱ्या या स्पर्धेसाठी ५० किलो, ५३ किलो, ५५ किलो, ५७ किलो, ५९ किलो, ६२ किलो, ६५ किलो, ६८ किलो, ७२ किलो तसेच महाराष्ट्र केसरी गट (६५ ते ७६ किलो) असे वजनी गट ठेवण्यात आले आहेत. या प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके दिली जाणार आहेत, तर प्रत्येक गटातील सुवर्णपदक विजेत्याला ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
“निर्झरा केअर फाउंडेशनच्या संचालिका स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी स्वतःच्या नफा व नुकसानीचा विचार न करता आपल्या वडिलांचा वारसा जपण्याचे काम करण्यासाठी सोलापूरमध्ये महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. ही स्पर्धा यशस्वी करून संपूर्ण राज्यात सोलापूरने आदर्श कुस्ती स्पर्धा भरवली असा नावलौकिक करण्यासाठी आपण सर्वजण मिळून तन-मन-धनाने काम करू आणि महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे शिवधनुष्य पेलूया, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
“  वडिलांच्या कुस्तीच्या सेवेसाठी व त्यांच्या छंदाला न्याय देण्यासाठी स्वाती अळ्ळीमोरे व सोमनाथ अळ्ळीमोरे स्वतःची पदरमोड करून करतात हे खरोखरच कौतुकास्पद आहे,” असे कल्याणशेट्टी  म्हणाले.
सोलापूर शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख, महापौर विनायक कोंड्याल, पाटबंधारे खात्याचे माजी सचिव चन्नवीर बिराजदार, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, राजाभाऊ देशपांडे, सोमनाथ पटणे, कुस्ती सम्राट अस्लम काझी, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, भीमराव बाळगे, केदार स्वामी आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राज साळुंखे, भरत मेकाले, नेताजी खंडागळे, सुधीर लांडे, गुड्डू पटणे, चन्नवीर बिराजदार आदींनी आपले विचार मांडले.
या कार्यक्रमास सोमनाथ अळ्ळीमोरे, आतिश मोरे, समीर कोळेकर, दीपक चौगुले, गोपीनाथ घोडके, अमर दुधाळ, दादासाहेब सरवदे, अर्जुन साठे, अनिल म्हाळगे, धीरज सरवदे, विलास कोरे यांच्यासह कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुस्ती निवेदक युवराज केचे यांनी केले.
सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर पेठ परिसरात असलेल्या हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर ही प्रतिष्ठेची स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक खेळाडू सहभागी होणार असून महिला महाराष्ट्र केसरी किताबासाठी भाग्यश्री फंड चौथ्यांदा जिंकण्यासाठी उत्सुक आहे. यापूर्वी तिने तीन वेळा हा किताब जिंकला आहे, अशी माहिती निर्झरा केअर फाऊंडेशनच्या संचालिका आणि संस्थापक स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी दिली.

*वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्पर्धेचे आयोजन*
स्वाती यांचे वडील सिद्धाराम साखरे हे स्वतः ज्येष्ठ कुस्तीपटू, पोलीस अधिकारी व समाजसेवक होते. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी निर्झरा केअर फाऊंडेशनची २०२३मध्ये स्थापना केली. स्वाती अळ्ळीमोरे-साखरे म्हणाल्या की, “सोलापूर जिल्ह्यामध्ये कुस्तीसाठी चांगले नैपुण्य आहे. मात्र अव्वल दर्जाच्या सुविधा, आखाडे व स्पर्धांचे व्यासपीठ याअभावी या खेळाडूंना अपेक्षेइतके आंतरराष्ट्रीय दर्जाचे करिअर करता येत नाही, हे लक्षात घेऊनच आम्ही निर्झरा फाऊंडेशनतर्फे कुस्तीगिरांच्या विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेत आहोत.”
==================
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

सोलापूरच्या सुपुत्राला अटल राष्र्टसेवा पुरस्कार

Next Post

लाडका भाऊ शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
लाडका भाऊ शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा

लाडका भाऊ शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक