Friday, June 19, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

लाडका भाऊ शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 27, 2026
in सोलापूर
0
लाडका भाऊ शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा
0
SHARES
73
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खा. ज्योती वाघमारे शेतकऱ्यांच्या बांधावर;

तातडीने पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना

सोलापूर,…
जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात येवती-पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी आज नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. “सरकार आणि लाडके भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहेत,” असा शब्द देत खासदार डॉ. वाघमारे यांनी हतबल झालेल्या बळीराजाला धीर दिला.

https://navprabhatnews.com/wp-content/uploads/2026/03/VID-20260327-WA0036.mp4

येवती-पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. द्राक्ष बागा, केळी, आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी गोठे आणि घरांचीही पडझड झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना खासदारांसमोर अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खा. वाघमारे यांनी घटनास्थळावरूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मोहोळ तालुक्यातील या नैसर्गिक आपत्तीची माहिती देत त्यांनी शासनाकडून तातडीने मदतीची मागणी केली आहे. तसेच उपस्थित असलेल्या कृषी अधिकारी, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना त्वरित पंचनामे पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या.
….,


“शेतकऱ्यांचे नुकसान पाहून मन हेलावले आहे. केवळ पंचनामे करून न थांबता, नुकसानभरपाई प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात पडेपर्यंत पाठपुरावा करेन. उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच दिलासादायक निर्णय होईल.”
— डॉ. ज्योतीताई वाघमारे (राज्यसभा खासदार)

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

२८ व २९ मार्चला सोलापूरमध्ये महिला महाराष्र्ट केसरी कुस्ती स्पर्धा

Next Post

आठवड्यातून दोन दिवस ग्रामपंचायतींकडून शाळांची स्वच्छता

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दिपक वैद्य झेडपी अध्यक्ष तर  इंद्रजित पवार उपाध्यक्ष

आठवड्यातून दोन दिवस ग्रामपंचायतींकडून शाळांची स्वच्छता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक