Friday, June 19, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

आठवड्यातून दोन दिवस ग्रामपंचायतींकडून शाळांची स्वच्छता

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 27, 2026
in सोलापूर
0
दिपक वैद्य झेडपी अध्यक्ष तर  इंद्रजित पवार उपाध्यक्ष
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोमवार व गुरुवार विभागप्रमुखांना मुख्यालयात राहणे बंधनकारक

झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्षांची सूचना

सोलापूर…

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना शिपाई नाहीत. त्यामुळे शाळांची स्वच्छता शिक्षक व विद्यार्थ्यांकडून केली जाते. यासंदर्भात शासन निर्णय निघाला असून जिल्हा परिषद शाळा स्वच्छ करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची आहे. त्यानुसार आठवड्यातून दोन दिवस ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून शाळांची स्वच्छता करावी, अशी सूचना उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या कामानिमित्त येणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय टाळण्यासाठी सोमवार व गुरुवार दोन दिवस सर्व विभागप्रमुखांनी मुख्यालयातच उपस्थित राहावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिले.

विविध विभागाचा आढावा घेतल्यानंतर ग्रामपंचायत, आरोग्य, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण व योजना विभागाचा अध्यक्ष, उपाध्यक्षांकडून आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी प्रशासनाला सूचना केली.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्रे व अंगणवाड्या यांच्या वीज बिलाचा प्रश्न नेहमी निर्माण होतो. त्यामुळे वीज बिलाच्या कटकटीतून मुक्त होण्यासाठी शाळा, आरोग्य केंद्रे व अंगणवाड्यांवर सौर पॅनल बसविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आल्यानंतर सीईओ कुलदीप जंगम यांनी सौर पॅनल बसविण्याबाबत नियोजन करून चार टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

लाडका भाऊ शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा

Next Post

पाच वर्षे सरकारी योजनांसाठी शेतकरी होणार अपात्र

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
पाच वर्षे सरकारी योजनांसाठी शेतकरी होणार अपात्र

पाच वर्षे सरकारी योजनांसाठी शेतकरी होणार अपात्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक