Friday, June 19, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

विदेशातील भक्तांना विठुरायाच्या महापूजेची भुरळ

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 28, 2026
in सोलापूर
0
विदेशातील भक्तांना विठुरायाच्या महापूजेची भुरळ
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंदिर समितीला मिळणार ९० लाखांचे उत्पन्न

पंढरपूर : कोट्यवधी भक्तांचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाची कीर्ती आता जगभर पसरू लागली आहे. विदेशातील भक्तांनाही विठुरायाच्या महापूजेची भुरळ पडू लागली आहे. देवाच्या नित्यपूजेसह विविध पूजांसाठी सातासमुद्रापलीकडे राहणाऱ्या अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दुबई अशा अनेक देशांतील परदेशी भाविकांनी मंदिर समितीकडे ऑनलाइन नोंदणी केली आहे. येत्या चार महिन्यांमध्ये होणाऱ्या या विविध पूजांच्या माध्यमातून मंदिर समितीला सुमारे ९० लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्नही मिळणार आहे.
शिर्डी, तिरुपती बालाजीनंतर आता पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी परदेशी भाविकांची संख्या वाढू लागली आहे. अवघ्या पाच ते सात मिनिटांत देवाच्या सर्व पूजांची नोंदणी पारदर्शकपणे पूर्ण झाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आज दिली.
श्री विठ्ठल-रुक्मिणीची दैनंदिन नित्यपूजा, पाद्यपूजा आणि तुळशी अर्चना पूजा केली जाते. या पूजा मंदिर समितीने भाविकांसाठी देणगीमूल्याच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत.
मागील काही वर्षांपासून या पूजांसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. त्यामुळे मंदिर समितीने ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. दर चार महिन्यांनी विविध पूजांची ऑनलाइन नोंदणी केली जाते. १ एप्रिल ते ३१ जुलै या चार महिन्यांसाठी बुधवारी २५ मार्च रोजी पहिल्याच दिवशी अवघ्या काही मिनिटांत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व तुळशी अर्चना पूजांची नोंदणी पूर्ण झाली. यामध्ये देशासह अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दुबई येथील अनेक भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा ऑनलाइन नोंदणी केली आहे.
तब्बल २० देशांतील भाविकांनी पूजा नोंदणी करण्यासाठी विठ्ठल मंदिर समितीच्या संकेतस्थळाला भेट दिली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची अवघ्या काही मिनिटांत १४८ पूजांची नोंदणी पूर्ण झाली. पूजेच्या माध्यमातून मंदिर समितीला सुमारे ९० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचेही मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

पाच वर्षे सरकारी योजनांसाठी शेतकरी होणार अपात्र

Next Post

सोलापूर झेडपीचे सीईओ ठरले “उत्कृष्ट कार्यालय प्रमुख”

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सोलापूर झेडपीचे सीईओ ठरले “उत्कृष्ट कार्यालय प्रमुख”

सोलापूर झेडपीचे सीईओ ठरले "उत्कृष्ट कार्यालय प्रमुख"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक