Friday, June 19, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

झेडपी शाळा इंग्लिश मिडीयमपेक्षा सरस

झेडपी शाळांडे पालकांचा कल वाढला

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 29, 2026
in सोलापूर
0
झेडपी शाळा इंग्लिश मिडीयमपेक्षा सरस
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शाळा सुरू होण्यापूर्वीच पहिलीत १६ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित, १२ हजार १२३ जणांचा प्रवेश अंतिम टप्प्यात

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या
शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने कंबर कसली असून ‘गुढी पाडवा, पट वाढवा’ मोहिमेत प्राथमिक शिक्षण विभागाने चांगली कामगिरी
केली आहे. जून महिन्यात सुरू होत असलेल्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पूर्वीच १६ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला असून १२ हजार १२३ जणांचा प्रवेश प्रगतिपथावर असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. त्यामुळे इंग्लिश मिडियमपेक्षा झेडपीच्या शाळा सरस ठरत असल्याचे दिसून येत आहेत.
आतापर्यंत सांगोला आणि अक्कलकोट तालुक्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सांगोला तालुक्यात सर्वाधिक २०८० , अक्कलकोट २०४२, दक्षिण सोलापूर १९८४ या तालुक्यांनीही पटनोंदणीत आघाडी घेतली आहे. ग्रामीण भागातील पालकांचा ओढा जिल्हा परिषद शाळांकडे वाढत असल्याचे हे सकारात्मक चित्र आहे. दुसरीकडे, पंढरपूर तालुक्याला जूनअखेरपर्यंत २६०२ विद्यार्थ्यांच्या प्रवेश उद्दीष्टापैकी ६५२ , मंगळवेढा १७३४ पात्र विद्यार्थ्यांपैकी फक्त ३२७ प्रवेश घेतला आहे.
गेल्यावर्षी २०२५-२६ मध्ये पहिलीची पटसंख्या २९ हजार ३०६ होती, यंदा मात्र २७ हजार आतापर्यंत एकूण १५,५७५ विद्याथ्यर्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, अजून १२,१२३ विद्यार्थ्यांची नोंदणी होणे बाकी आहे. जूनअखेरपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाने ‘डोअर टू डोअर’ कॅम्पेन राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पटसंख्या वाढविण्यासाठी जिल्ह्यात विशेष परिश्रम शिक्षक घेत आहेत. सातत्याने बैठका आढावा व पाठपुरावा केल्याने शिक्षकांनी चांगली कामगिरी केली.
जिल्ह्यातील प्रत्येक पात्र मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जूनअखेरपर्यंत १२ हजार विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता आणि पटसंख्या दोन्ही उंचावण्याचा मानस असल्याचे झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी सांगितले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

सोलापूर झेडपीचे सीईओ ठरले “उत्कृष्ट कार्यालय प्रमुख”

Next Post

‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा जपणारा उसत्व

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा जपणारा उसत्व

'चाचा नेहरू बालमहोत्सव’ सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा जपणारा उसत्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक