Friday, June 19, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा जपणारा उसत्व

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 29, 2026
in सोलापूर
0
‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा जपणारा उसत्व
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बाल महोत्सवामुळे मुला-मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना  – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर :  चाचा नेहरू बालमहोत्सव’ हा केवळ क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम नसून सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा जपणारा उसत्व आहे, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना, कौशल्यांना , धैर्याला वाव मिळण्यासाठी हा बाल महोत्सव महत्त्वपूर्ण असतो. यामध्ये उत्साहाने सहभागी होणे सर्वात महत्त्वाचे असते. या बाल महोत्सवामुळे मुला-मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
 महिला व बालविकास विभागाच्या वतीने पहिला राज्यस्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विभागीय उपआयुक्त संजय माने. कृष्णा राठोड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय खोमणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले,बाल विकास प्रकल्प अधिकारी भुजंग चिंताकोटे.सिंहगड कॉलेज संचालक संजय नवले,बाल कल्याण समिती अध्यक्ष. समीर सय्यद, सदस्य सुवर्णा कोकरे, बाल न्याय मंडळ सदस्य गीता तोतकुल यांच्यासह मान्यवर ,अधिकारी कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, क्रीडा हे एक सांघिक खेळ असून त्यामुळे स्फूर्ती, शिस्त, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभते. “मुलांनो ,तुम्ही मैदानावर हरले तरी चालेल, पण आयुष्यात कधीही हार मानू नका, आपल्या कर्तृत्वातून आपली ओळख निर्माण करावी राज्यातील पहिलाच ‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ सोलापुरात होत असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
या महोत्सवात राज्यातील ३६ जिल्ह्यांमधून पुणे, कोकण, छत्रपती संभाजी नगर ,नाशिक, अमरावती व नागपूर विभाग या सहा विभागातील अनाथालय व बालगृहातून सुमारे हजारो मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला . विविध क्रीडा स्पर्धांमधून व सांस्कृतिक कार्यक्रमातून आपली कौशल्ये ते सादर करत आहेत. हा महोत्सव तीन दिवस चालणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व चाचा नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आले .  प्रास्ताविक विभागीय उपायुक्त महिला व बालविकास संजय माने यांनी केले . आभार प्रदर्शन जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजय खोमणे यांनी केले, तर सूत्रसंचालन  जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी रेश्मा गायकवाड  यांनी केले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

झेडपी शाळा इंग्लिश मिडीयमपेक्षा सरस

Next Post

कुस्तीपटू सोनाली मंडलिकचा कुस्तीला ‘रामराम’

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
कुस्तीपटू सोनाली मंडलिकचा कुस्तीला ‘रामराम’

कुस्तीपटू सोनाली मंडलिकचा कुस्तीला 'रामराम'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक