Friday, June 19, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

कुस्तीपटू सोनाली मंडलिकचा कुस्तीला ‘रामराम’

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 29, 2026
in सोलापूर
0
कुस्तीपटू सोनाली मंडलिकचा कुस्तीला ‘रामराम’
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महिला कुस्ती वर्तुळात चिंता

सोलापूर: 
 हरीभाई प्रशालेच्या मैदानावर उत्साहात पार पडलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला एका भावनिक वळणाने धक्का बसला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कापरेवाडी येथील रिलस्टार कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिने पराभवानंतर कुस्तीला अखेरचा रामराम करण्याची घोषणा केली आहे.

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सोनालीला अपेक्षा पाटील हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर ओपन गटात निवड न झाल्यामुळे ती प्रचंड निराश झाली. या पराभवानंतर तिने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भावनिक होत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आर्थिक अडचणी, स्पॉन्सरशिपचा अभाव, योग्य खुराक न मिळणे तसेच ६५ किलोपेक्षा वजन वाढवता न आल्याने ओपन गटात संधी गमावल्याची खंत तिने व्यक्त केली.

सोनाली मंडलिक ही अत्यंत सामान्य कुटुंबातील असून तिने प्रचंड संघर्षातून कुस्तीमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. कोणत्याही आधुनिक सुविधा नसताना पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या तालमीतून तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. कठोर मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर तिने राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर नाव कमावले. ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली होती.

ओतूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेतही तिने चांदीची गदा आणि रोख पारितोषिक जिंकत आपली ताकद दाखवून दिली होती. तिच्या यशामुळे अनेक ग्रामीण भागातील मुलींना कुस्ती क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळाली. मात्र अशा प्रतिभावान खेळाडूला आवश्यक आर्थिक पाठबळ, योग्य मार्गदर्शन आणि पोषण सुविधा न मिळाल्याने तिला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याची खंत क्रीडावर्तुळातून व्यक्त होत आहे.

स्पर्धेनंतर सोनालीने तत्काळ सोलापूर सोडत सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत ती रडत रडत कुस्ती सोडत असल्याची घोषणा करताना दिसते. तिच्या या निर्णयामुळे महिला कुस्तीपटूंमध्ये आणि क्रीडाप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना भेडसावणाऱ्या अडचणी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

सोनाली मंडलिकसारख्या जिद्दी आणि प्रतिभावान खेळाडूने घेतलेला हा निर्णय केवळ वैयक्तिक नसून ग्रामीण क्रीडा व्यवस्थेतील उणिवांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरत आहे. योग्य वेळी आवश्यक मदत आणि संधी मिळाली असती, तर अशा खेळाडूंनी देशासाठी मोठी कामगिरी करण्याची क्षमता असल्याचे मत क्रीडा तज्ञांकडून व्यक्त होत आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा जपणारा उसत्व

Next Post

कोल्हापूरची अमृता पुजारी ४ थी महिला महाराष्ट्र केसरी!

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
कोल्हापूरची अमृता पुजारी ४ थी महिला महाराष्ट्र केसरी!

कोल्हापूरची अमृता पुजारी ४ थी महिला महाराष्ट्र केसरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक