Friday, June 19, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

उजनी धरणात ७ टीएमसी पाणी आरक्षित

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 30, 2026
in सोलापूर
0
उजनी धरणात ७ टीएमसी पाणी आरक्षित
0
SHARES
69
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ऊन्हाळ्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना 

सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहर तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी आरक्षण समितीची बैठक ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, अधीक्षक अभियंता सुभिवेंद्र खांडेकर, लाभक्षेत्र विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उजनी धरणात ७.० टीएमसी पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला .

   मे २०२६ पासून भीमा नदीमार्गे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गठीत करण्यात आलेल्या या समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी कार्यरत आहेत. उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन उजनी धरणामध्ये पिण्यासाठी आवश्यक पाणी राखून ठेवण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

कोल्हापूरची अमृता पुजारी ४ थी महिला महाराष्ट्र केसरी!

Next Post

राज्यातील १४,५०० सरपंच “नामधारी”

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
राज्यातील १४,५०० सरपंच “नामधारी”

राज्यातील १४,५०० सरपंच "नामधारी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक