जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला
सोलापूर:- सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून नवीन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्वीकारला. यावेळी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांत अधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार निलेश पाटील, पंढरपूर चे तहसिलदार सचिन लंगुटे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या 2 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली तर सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती झाली आहे.
….
जिल्हाधिकारी म्हणून काम करताना अधिकाधिक विकास करण्यासाठी प्राधान्य देणार आहे. सर्वांच्या सहकार्याने कालावधी पूर्ण करणार आहे. जिल्ह्यातील नागरीकांना महत्व देऊन कार्यालयीन कामकाज करणा आहे.
कार्तिकेयन एस. नूतन जिल्हाधिकारी सोलापूर
….
सोलापूर जिल्हाधाकारी म्हणून काम करताना सर्वांच्या सहकार्यामुळे आयटी पार्क , विमानतळ, आषाढी वारी व महापूर यासारख्या गोष्टीत निर्णय घेणे शक्य झाले. मी सोलापूरातून गेलो तरी सोलापूर माझ्या मनातून जाणार नाही.
कुमार आशीर्वाद , तत्कालीन जिल्हाधिकारी सोलापूर
_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









