Thursday, June 18, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी घेतले विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 3, 2026
in सोलापूर
0
जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी घेतले विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूरातील विकासकामांचा घेतला आढावा

पंढरपूर, :- सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.यावेळी मंदिर समितीच्या वतीने नगराध्यक्षा तथा मंदिर समितीचे पदसिद्ध सदस्या प्रणिता भालके ,मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांचा उपरणे व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले उपस्थित होते.

कार्तिकेयन एस. हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०२० बॅच चे (आय. ए. एस.) महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. ते यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पंढरपूर येथे भेट देऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सदर कामाची माहिती कार्तिकेयन एस. यांनी घेतली. यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या व करण्यात आलेल्या कामांची माहिती यावेळी दिली.यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

आजपासून कार्तिकेयन एस. सोलापूरचे जिल्हाधिकारी

Next Post

नागरीकांच्या ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष , अधिकारी “सेटींग” दक्षिणची पहिलीच बैठक “फेल”

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
नागरीकांच्या ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष , अधिकारी “सेटींग” दक्षिणची पहिलीच बैठक “फेल”

नागरीकांच्या ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष , अधिकारी "सेटींग" दक्षिणची पहिलीच बैठक "फेल"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक