Thursday, June 18, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

नागरीकांच्या ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष , अधिकारी “सेटींग” दक्षिणची पहिलीच बैठक “फेल”

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 3, 2026
in सोलापूर
0
नागरीकांच्या ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष , अधिकारी “सेटींग” दक्षिणची पहिलीच बैठक “फेल”
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“चार वर्षांनी मिळालेली संधी वाया ,
दक्षिण पंचायत समितीचा पहिलाच ‘फुसका शो”

अधिकाऱ्यांना जाबच नाही; नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांना बगल, अधिकारी मर्जी सांभाळणार्‍या सदस्यांच्या भूमिकेविषयी सवाल।

दक्षिण सोलापूर:
तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर झालेल्या पंचायत समितीच्या पहिल्याच मासिक बैठकीत नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर ठोस चर्चा होईल, प्रशासनाला धारेवर धरले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात ही बैठक केवळ औपचारिकतेतच अडकून राहिल्याचे चित्र समोर आले. घरकुल, विकासनिधी, परवानग्या, शिक्षण व्यवस्था, भ्रष्टाचाराच्या तक्रारी अशा गंभीर मुद्द्यांवर ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रशासक राजवटीच्या चार वर्षांत निधीचा कथित गैरवापर, मनमानी कारभार आणि नागरिकांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नव्या सदस्यांकडून अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल, जबाबदारी निश्चित केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र बैठकीत अधिकाऱ्यांवर कुठलाही दबाव न आणता सौम्य भूमिका घेतल्याने “ही बैठक नेमकी कोणासाठी?” असा सवाल उपस्थित होत आहे.
दक्षिण सोलापूरमध्ये घरकुलांची रखडलेली कामे, लाभार्थ्यांना बिलासाठी मारावे लागणारे हेलपाटे, विहिरींच्या प्रलंबित परवानग्या, निधी मंजुरीत होणारी आर्थिक पिळवणूक, शाळांची दयनीय अवस्था, शिक्षकांची गैरहजेरी, मागासवर्गीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांची बिकट परिस्थिती अशा असंख्य प्रश्नांचा डोंगर असताना त्यावर ठोस चर्चा न होणे हे धक्कादायक मानले जात आहे. त्यामुळे सदस्यांची पहिलीच बैठक “फुसका बार” ठरल्याची चर्चा गावागावात रंगली आहे.
दरम्यान, मंद्रूप येथील ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांच्या बदलीनंतरही पदभार न सोडण्याचा मुद्दा बैठकीत चर्चेत आला. सीईओ कुलदीप जंगम यांच्या आदेशानंतरही प्रशासनाकडून वारंवार पत्रव्यवहार होऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. काही सदस्यांकडून नियमबाह्य ठरावाचा प्रयत्न झाल्याचीही चर्चा असून या प्रकारामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या संगनमताचा संशय अधिक बळावला आहे.
…..
चौकट
….
‘बीडीओ दिसत नाहीत’ – नागरिकांचा संताप उसळला
….
सीना-भीमा खोऱ्यासह मुस्ती–तांदूळवाडी परिसरातील नागरिक बीडीओ मनोज राऊत व विभागप्र मुखांना भेटण्यासाठी वारंवार दक्षिण पंचायत समितीत येत आहेत. मात्र अधिकारी वेळेवर उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे. प्रशासनातील ही बेफिकिरी थांबवण्यासाठी सभापती संदीप टेळे व इतर “हुशार” सदस्य यांनी कठोर भूमिका घेण्याची मागणी जोर धरत आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी घेतले विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

Next Post

तब्बल २० वर्षांनंतर महसूल विभागाच्या आकृतिबंधाला मान्यता

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
तब्बल २० वर्षांनंतर महसूल विभागाच्या आकृतिबंधाला मान्यता

तब्बल २० वर्षांनंतर महसूल विभागाच्या आकृतिबंधाला मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक