Thursday, June 18, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पवित्र पोर्टलवरील पसंतीक्रम अट्ट रद्द करा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 4, 2026
in सोलापूर
0
पवित्र पोर्टलवरील पसंतीक्रम अट्ट रद्द करा
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 शिक्षक संघटनांकडून मागणी

सोलापूर… शिक्षक भरतीसाठीच्या पवित्र पोर्टलवरील पसंतीक्रम मर्यादेच्या नव्या अटींवरून राज्यभरात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. २ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारांतील सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होणार असले तरी, त्यापैकी लॉक करता येणाऱ्या पसंतीक्रमांवर मर्यादा घालण्यात आली आहे.

     नवीन तरतुदीनुसार, मुलाखतीशिवायच्या निवडीसाठी उमेदवारांना जास्तीत जास्त १०० पसंतीक्रम लॉक करता येणार आहेत, तर मुलाखतीसहच्या प्रकारासाठी ही मर्यादा ५० इतकी ठेवण्यात आली आहे. मात्र, ही अट अन्यायकारक व जाचक असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.

    या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “१०० पसंतीक्रमांची अट तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे अमर्याद पसंतीक्रमाची सुविधा लागू करावी. अन्यथा कमी व मध्यम मेरिटधारक उमेदवारांचे मोठे नुकसान होईल,” अशी नाराजी
राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, अनेक ठिकाणी १०० जागांमधून केवळ १० उमेदवारांचीच मुलाखतीद्वारे निवड होत असल्याने उर्वरित उमेदवारांसाठी संधी मर्यादित होत आहे.
दरम्यान, १२ ते १७ मार्चदरम्यान मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले.
एकूणच, पवित्र पोर्टलवरील पसंतीक्रम मर्यादेच्या मुद्द्यावरून राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून, सरकारने यावर लवकरात लवकर पुनर्विचार करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

तब्बल २० वर्षांनंतर महसूल विभागाच्या आकृतिबंधाला मान्यता

Next Post

राष्र्टिय कर्तव्यामुळे ऊन्हाळी सुट्यांवर गदा , हौशी शिक्षकांमधून नाराजी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
राष्र्टिय कर्तव्यामुळे ऊन्हाळी सुट्यांवर गदा , हौशी शिक्षकांमधून नाराजी

राष्र्टिय कर्तव्यामुळे ऊन्हाळी सुट्यांवर गदा , हौशी शिक्षकांमधून नाराजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

108508

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697