शाळांसह आरोग्य केंद्रांवर सोलार पॅनल
सोलापूर :
जिल्हा परिषदेच्या शाळा,
प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सोलर पैनल बसविण्यात येत आहे. त्यामुळे शाळा, आरोग्य केंद्राचे वीजबिल आता शून्य होईल. सोलर पैनल लवकरात लवकर बसवावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रम अंतर्गत पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकती अधिकारी जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिणकर यांनी सोलर पॅनल बसविण्यासाठी २२ कोटी रुपयांच्या निविदेस मंजुरी दिली होती. त्यातून सोलर पॅनल बसविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या ४०० शाळा, १३२ ग्रामपंचावती, ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र, नऊ पंचायत समित्या आणि चार विश्रामगृहांच्या इमारतीवर सोलर पॅनल बसविण्याच्या कामाला सुरुशत करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ऑनधीड सोलर योजना आहे. शासकीय इमारतीवर सोलर पॅनाल बसविल्यानंतर ही बीज एमएससीबीला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र पंचायत समिती आणि विश्रामगृहाच्या वीजबिलात बचत होणार आहे. छोट्या शाळेवर दोन वॅट, मोठ्या शाळेवर पाच वॅट, ग्रामपंचायत इमारतीवर तीन वॅट, प्राथमिक आरोग्य केंद्रावर २५ वॅट सोलार पॅनल बसविण्याचे काम सुरू असून, त्याची कामे लवकरच पूर्ण होणार आहेत.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









