१० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
सोलापूर :
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. येत्या १० एप्रिलपासून देशातील सर्व टोल नाक्यांवरील रोख (कॅश) व्यवहार पूर्ण बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे आता टोल प्लाझावर केवळ फास्टॅग, ‘यूपीआय’ द्वारेच व्यवहार करता येणार आहे . डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी व टोल नाक्यांवरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
देशातील सुमारे १,१५० टोल नाक्यांवर ही नवीन व्यवस्था लागू होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असला, तरी वाढीव दरांमुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर मात्र परिणाम होणार आहे. त्यामुळे १० एप्रिलपूर्वी फास्टॅग रिचार्ज करून ठेवणे वाहनधारकांसाठी हिताचे ठरणार आहे.
एकीकडे डिजिटल क्रांती होत असताना दुसरीकडे वाहनधारकांच्या खिशाला मात्र कात्री बसणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआय आणि उत्तर प्रदेश एक्स्प्रेस वे औद्योगिक विकास प्राधिकरणाने (यूपीईआयडीए) टोलच्या दरांमध्ये पुढीलप्रमाणे वाढ केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग : कार आणि
प्रवासी वाहनांच्या टोलमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
एक्स्प्रेस वे : उत्तर प्रदेशातील
एक्स्प्रेस वेवरील टोल दरात १.५० ते ३.५० टक्क्यांची वाढ झाली आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









