Thursday, June 18, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 9, 2026
in सोलापूर
0
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्ह्यातील स्मशानभूमींचा विषय संपविणार … पालकमंत्री

सोलापूर :
जर गावात स्मशानभूमी नसेल तर गावांना विकास कामांसाठी निधी मिळणार नाही. यासाठी आता गावात स्मशानभूमी आहे, असा दाखला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या गावात स्मशानभूमी नाही त्या गावातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
कोणत्याही गावात विकासनिधी देण्यापूर्वी त्या गावात स्मशानभूमी असणं आवश्यक केलं आहे. त्यामुळे स्मशानभूमीला प्राधान्य दिल्यानं आता अनेक गावात स्मशानभूमीची कामे होत आहेत, ज्या गावात स्मशानभूमी नाही, त्या गावांना विकासनिधी देणं बंद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सीईओ कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, आ. देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात स्मशानभूमी नाही. अनेक गावात स्मशानभूमी साठी जमीन आहे; मात्र सेवासुविधा नसल्याने त्याचा वापर होत नाही. अनेक गावातील जमिनीचा वाद कोर्टात सुरू आहे. त्यामुळे स्मशानभूमीचा विषय सोलापूर जिल्ह्यात चांगलाच भेडसावत आहेत. जिल्ह्यातील १२० गावात स्मशानभूमीसाठी जिल्हा परिषदेने जागा उपलब्ध करून दिली आहे, मात्र त्या स्मशानभूमीतील सेवासुविधा निर्माण करण्यासाठी निधीची गरज आहे. त्या स्मशानभूमीसाठी निधी दिला जाईल, त्यासाठी कोणतीही अडचण नसल्याचे पालकमंत्री म्हणाले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

अनंत’ माणुसकीच्या महोत्सवातून  समाजाला नवी दिशा : महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार 

Next Post

पहिलीच्या प्रवेशासाठी ३१ डिसेंबरपर्यंत सहा वर्षे पूर्ण होणे सक्तीचे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
पहिलीच्या प्रवेशासाठी ३१ डिसेंबरपर्यंत सहा वर्षे पूर्ण होणे सक्तीचे

पहिलीच्या प्रवेशासाठी ३१ डिसेंबरपर्यंत सहा वर्षे पूर्ण होणे सक्तीचे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक