Saturday, June 13, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 13, 2026
in सोलापूर
0
आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू

 

मदत आणि उपचाराला मिळणार गती

मुंबई: राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन ८ तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. त्यामुळे उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. या प्रणालीचे येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षा कडून देण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षभरापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये नावीन्य पूर्ण रुग्णस्नेही बदल करण्याचे काम सुरु आहे. त्याचाच एक भाग मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाईन प्रणाली असणार आहे. रुग्णाने रुग्णालयात सर्व रीतसर कागदपत्रे दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन त्याचा अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविणार आहे. त्या ठिकाणी नियमानुसार सर्व कागदपत्रे असल्यास अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन ८ तासांत पूर्ण होणार आहे. यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, गेल्या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले की, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत आहे. यामुळे आता अर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होऊन रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन प्रणालीचे अधिकृत उद्घाटन लवकरच होणार असून, त्यानंतर राज्यभरात ती प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गरजू रूग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

 

Previous Post

बारा हजार थकबाकीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाचे वीज कनेक्शन बंद

Next Post

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झेडपीत विविध कार्यक्रम

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झेडपीत विविध कार्यक्रम

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झेडपीत विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया

लोकअदालतीच्या नावाखाली होणार्‍या फसवणुकीपासून सावध राहावे

June 13, 2026
रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

June 13, 2026
अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

June 13, 2026
गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

June 13, 2026
काॅलेजला दांडी मारणार्‍या काॅलेजकुमारांना दणका

काॅलेजला दांडी मारणार्‍या काॅलेजकुमारांना दणका

June 13, 2026
१६ वा वित्त आयोगात स्वच्छतेसाठी ५० टक्के निधीची तरतूद

१६ वा वित्त आयोगात स्वच्छतेसाठी ५० टक्के निधीची तरतूद

June 12, 2026
 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

June 12, 2026
मंद्रूप ग्रामपंचायतीकडून सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

मंद्रूप ग्रामपंचायतीकडून सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

June 11, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक