Saturday, June 13, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झेडपीत विविध कार्यक्रम

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 13, 2026
in सोलापूर
0
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झेडपीत विविध कार्यक्रम
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीदिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती दिनी दि. १४ एप्रिल रोजी सोलापूर जिल्हा परिषदेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे. जिल्हा परिषदेचे आवारातील संविधान कोनशिलेस सकाळी १० वाजता पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे . यशवंतराव चव्हाण सभागृहात भिम शाहिर संदिप शिंदे प्रबोधन मंच सोलापूर, सादरकर्ते प्रा. जिवन संदिप शिदे व संच यांची भीम गीत यांचे गायन, समता रजनी कार्यक्रम होणार आहे. 

या कार्यक्रमात संविधान उद्देशिका वाचन होणार असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्रावर निलेश विमल धायरकर पुणे यांचे राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमात समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभार्थ्याचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार , समाजकल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीचे सभापती अॅड. अमृता वाघे, व मा. जिल्हा परिषद सदस्य या पदाधिकारी यांचे सह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिणकर यांचेसह सर्व खातेप्रमुख हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमाचे आयोजन समाज कल्याण विभागाचे वतीने करणेत आले असल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले.

….

.तालुकास्तरावर विविध कार्यक्रम

…,,

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमांतर्गत इयत्ता 7वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय वर्तृत्व स्पर्धा दि. 14 एप्रिल 2026 रोजी तालुकास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
सदर वक्तृत्व स्पर्धेमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य तसेच सन 2026 हे वर्ष महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष म्हणुन साजरे करण्यात येत असुन त्यानिमित्ताने चवदार तळे, महाड येथील सत्याग्रहासंबंधी व त्यानुषंगाने मानवी हक्कांचे महत्व प्रतिपादन असणारे तसेच संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त संत गाडगे महाराज यांच्या कार्याचे महत्व प्रतिपादन असणारे विषय घेण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेमधुन प्रथम, व्दितीय व तिसऱ्या क्रमाकांचे विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व रोख पारीतोषक अनुक्रमे रु. 11000, रु. 9000, व 7000 रूपये  दिनांक 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनी वितरीत करण्यात येणार आहेत.

_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

Next Post

तांड्याच्या विकासासाठी कटिबध्द … खा. शिंदे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
तांड्याच्या विकासासाठी कटिबध्द … खा. शिंदे

तांड्याच्या विकासासाठी कटिबध्द ... खा. शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया

लोकअदालतीच्या नावाखाली होणार्‍या फसवणुकीपासून सावध राहावे

June 13, 2026
रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

June 13, 2026
अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

June 13, 2026
गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

June 13, 2026
काॅलेजला दांडी मारणार्‍या काॅलेजकुमारांना दणका

काॅलेजला दांडी मारणार्‍या काॅलेजकुमारांना दणका

June 13, 2026
१६ वा वित्त आयोगात स्वच्छतेसाठी ५० टक्के निधीची तरतूद

१६ वा वित्त आयोगात स्वच्छतेसाठी ५० टक्के निधीची तरतूद

June 12, 2026
 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

June 12, 2026
मंद्रूप ग्रामपंचायतीकडून सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

मंद्रूप ग्रामपंचायतीकडून सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

June 11, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक