Saturday, June 13, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 14, 2026
in सोलापूर
0
सोलापूर जिल्हा परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जयंती निमित्त भिमगितांनी दणाणले सभागृह

सोलापूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती सोलापूर जिल्हा परिषदेत विविध कार्यक्रमांनी साजरी करणेत आली. विविध भिमगीतांनी सभागृह दणाणून गेले. जिल्हा परिषदेचे आवारातील संविधान कोनशिलेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार समाजकल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते, कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीचे सभापती अॅड. अमृता वाघे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिणकर यांचे हस्ते पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मराठी सेवा संघाचे वतीने पक्षांसाठी सुरू केलेले पाण्याचे व्यवस्थेचा शुभारंभ मान्यवरांचे हस्ते करणेत आला.

यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रारंभी दिप प्रज्वलन करून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करणेत आले. भिम शाहिर संदिप शिंदे प्रबोधन मंच सोलापूर, सादरकर्ते प्रा. जिवन संदिप शिदे व संच यांनी भीम गीत गायन केले. समाज कल्याण विभाग व कास्ट्राईब संघटनेचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.
प्रारंभी समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी संविधान उद्देशिका वाचन केले.

*भारताची राजधानी हैद्राबाद येथे करणेची डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पना – विमल धायरकर*

भारताची राजधानी हैद्राबाद येथे करा. मध्यवर्ती ठिकाण असल्याचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचविले होते. बाबासाहेब यांते जीवन चरित्रावर निलेश विमल धायरकर पुणे यांनी राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन केले. डाॅ. बाबासाहेब यांनी भाषावाद व प्रांत वाद होणार नाही याची काळजी घेतली. भारतीय रुपयाचे अवमुल्यन होत असल्याचे ग्रंथातून त्यांनी स्पष्ट केले असल्याचे व्याख्याते धायरकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमात समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभार्थ्याचा व आंतरजातीय विवाह केलेले जोडप्यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वैद्य व उपाध्यक्ष पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार , समाजकल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते, कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीचे सभापती अॅड. अमृता वाघे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे , उप मुख्य कार्यकारी सुर्यकांत भुजबळ, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी , कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, शिक्षणाधिकारी कादर शेख , कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरूण क्षिरसागर, लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अधिक्षक गिरीष जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , रणजित घोडके, अभिमन्यु कांबळे , विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे यांचेसह सर्व खातेप्रमुख हे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी प्रास्ताविक केले.

*सर्व क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान- सिईओ कुलदीप जंगम*
देशाच्या सर्व क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान दिले असे मत जिल्हा परिषदेचे सिईओ कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले. त्यांना एका समाजापुरते सीमित केले असल्याची खंत व्यक्त करून परदेशात महिलांना मतदानाचा अधिकारी देणे साठी १५० वर्षे लागली परंतु भारतात स्वातंत्र्य मिळाले नंतर लगेच मदतानाचा महिलांना अधिकार मिळाला. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान असल्याचे सिईओ कुलदीप जंगम सांगितले. विकसीत भारतासाठी काम करूया असे आवाहन सिईओ जंगम यांनी केले.

*शिक्षण वाघीणीचे दुध – अध्यक्ष वैद्य*
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. ती पिल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे विचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे होते. असेही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील सर्व घटकांपर्यंत जिल्हा परिषेदेचे कार्य सुरू आहे. कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी जिल्हा परिषद घेत असल्याचे अध्यक्ष वैद्य यांनी सांगितले.
या प्रसंगी समाज कल्याण विभागाचे सभापती संस्कृती सातपुते बोलताना म्हणाल्या, देशाला स्वातंत्र्य बरोबर इतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बील लिहिले. त्यांची अंमलबजावणी होत नाही म्हणून संघर्ष केला. जगात रक्तरंजित क्रांती झाल्या परंतू भारतात अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळविणे साठी प्रयत्न केले. महिलांना मतदानाचा अधिकार मिळणे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्वपुर्ण योगदान आहे. मराठी व इंग्रजी भाषणातून सभापती सातपुते यांनी बाबासाहेब यांचे कार्याची माहिती दिली. समाज कल्याण विभाग जिल्ह्यात विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.
या प्रसंगी महिला व बाल कल्याण विभागाचे सभापती अॅड. अमृता वाघे यांनी मनोगत व्यक्त केले. यासाठी अधिक्षक सचिन सोनकांबळे, विस्तार अधिकारी स्वाती गायकवाड, विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे यांनी प्रयत्न केले . या प्रसंगी कास्ट्राईब संघटनेचे वतीने उमाकांत राजगुरू, योगेश कटकधोंड, शंकर चलवादी, धन्यकुनार राठोड यांना मान्यवरांचे हस्ते मिठाई वाटप केली.
प्रारंभी कास्ट्राईब संघटनेच्या कार्यालयात मान्यवरांनी भेट देऊन जयंती निमित्त कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन विस्तार अधिकारी सुहास गुरव यांनी केले तर कल्याण श्रावस्ती यांनी आभार मानले.

चौकट घेणे

*कास्ट्राईब संघटनेचे वतीने मिठाईचे वाटप*

जयंती निमित्त कास्ट्राईब संघटनेचे वतीने उपस्थित सर्वांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे हस्ते मिठाईचे वाटप करणेत आले. कास्ट्राईब संघटनेचे जिल्हा अरूण क्षिरसागर यांनी ही परंपरा अनेक वर्षा पासून कायम ठेवली आहे. संघटनेचे उमाकांत राजगुरू, योगेश कटकधोंड, शंकर चलवादी, धन्यकुनार राठोड यांनी मिठाई वाटप करणे साठी परिश्रम घेतले.

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भिमगितांनी दणाणले सभागृह*

जिल्हा परिषदेच्या
यशवंतराव चव्हाण सभागृहात भिम शाहिर संदिप शिंदे प्रबोधन मंच सोलापूर, सादरकर्ते प्रा. जिवन संदिप शिदे व संच यांनी भीम गीत गायन केले. समाज कल्याण विभाग व कास्ट्राईब संघटनेचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. बाबासाहेब यांचे जीवनावरील कार्याची भिमगिते या वेळी सादर करून सभागृह दणाणून सोडले..

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

 

Previous Post

तांड्याच्या विकासासाठी कटिबध्द … खा. शिंदे

Next Post

सोलापूरमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सोलापूरमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद

सोलापूरमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

June 13, 2026
गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

June 13, 2026
काॅलेजला दांडी मारणार्‍या काॅलेजकुमारांना दणका

काॅलेजला दांडी मारणार्‍या काॅलेजकुमारांना दणका

June 13, 2026
१६ वा वित्त आयोगात स्वच्छतेसाठी ५० टक्के निधीची तरतूद

१६ वा वित्त आयोगात स्वच्छतेसाठी ५० टक्के निधीची तरतूद

June 12, 2026
 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

June 12, 2026
मंद्रूप ग्रामपंचायतीकडून सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

मंद्रूप ग्रामपंचायतीकडून सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

June 11, 2026
खत दुकानदारांची “लिंकींग” बंद होणार !

खत दुकानदारांची “लिंकींग” बंद होणार !

June 9, 2026
साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

105627

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697