Tuesday, September 22, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

‘राजकारण’ व अधिकार्‍यांच्या ‘दबाव’तंत्राचा मंद्रूपच्या शेतकर्‍यांना फटका

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 9, 2026
in सोलापूर
0
‘राजकारण’ व अधिकार्‍यांच्या ‘दबाव’तंत्राचा मंद्रूपच्या शेतकर्‍यांना फटका
0
SHARES
199
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेंडगे वस्तीच्या रस्त्याला स्थगिती

आम्हाला रस्ता करून द्या.. शेंडगे वस्तीच्या शेतकर्‍यांची विनंती

मंद्रूप…
ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देऊन एका महिन्यानंतर दुसर्‍या ठेकेदारांनी तक्रार केल्यामुळे अनेक दिवसांपासून वादात सापडलेल्या रस्त्याचे काम बंद ठेवण्याचे आदेश बांधकाम उपअभियंता यांनी दिली आहे. त्यामुळे मंद्रूपमधील शेंडगे वस्तीच्या शेतकर्‍यांना पुन्हा राजकीय गटबाजी व ठेकेदारांच्या वादाचा फटका बसला आहे. स्थानिक राजकारण व अधिकार्‍यांच्या दबावतंत्राचा फटका मंद्रूपच्या शेतकर्‍यांना फटका बसल्यामुळे राजकारणापेक्षा आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता करून द्या, अशी विनंती शेतकरी करीत आहेत.
अनेक वर्षांपासून शेंडगे वस्तीच्या रस्त्याचा विषय प्रलंबित आहे. यासाठी शेतकर्‍यांनी आमदारांची भेट घेऊन निधीची मागणी केली. त्यानंतर जनसुविधाअंतर्गत लोकसेवा शाळेपासून शेंडगे वस्तीपर्यंत २० लाख रूपयांची निधी मंजूर करण्यात आली. या कामाचा ठेका मिळविताना भुरीकवठे येथील आशीर्वाद मजूर संस्था व माळकवठे येथील अमोगसिध्द मजूर संस्था यांच्यामध्ये स्पर्धा होती. यामध्ये ६ एप्रिलला माळकवठे येथील मजूर संस्थेला रस्ता करण्याचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यामुळे ठेकेदारांनी काम करण्यास सुरूवात केली. मात्र भुरीकवठे येथील संस्थेनी शेंडगे वस्तीच्या रस्त्याच्या कामाबद्दल तक्रार केल्यानंतर दक्षिणच्या गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सुनावणी घेऊन ठेकेदारांमधिल वाद मिटविण्याचे आदेश दिले. ठेकेदारांच्या वादात विकास निधि परत जाऊ नये, याची दक्षता घेण्याची सूचना केली. त्यानुसार दक्षिण पंचायत समिती बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांनी ठेकेदारांमधील वाद मिटेपर्यंत काम बंद ठेवण्याचे आदेश दिले.
एकीकडे दक्षिणच्या बांधकाम विभागाकडून कार्यारंभ मिळाल्यानंतर सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आली आहे. तर दुसरीकडे तक्रारीमुळे एक महिना काम सुरू करता आले नाही. शिवाय महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे ठेकेदाराला मुदतवाढ मिळणार का ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
दक्षिण पंचायत समितीकडे मंद्रूपमधील निकृष्ट कामाबद्दल अनेक तक्रारी असताना ‘अर्थ’पूर्ण चर्चामुळे ती विकासकामे थांबविण्याचे आदेश देण्यात आले नाही. त्यामुळे कोट्यावधी रूपये पाण्यात गेली आहेत. याकडे अधिकारी गांभीर्याने न पाहता स्थानिक राजकारण व गटबाजीत हस्तक्षेप करीत शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या रस्त्याला जाणिवपूर्वक स्थगिती देऊन प्रशासनही राजकारण करीत असल्याची चर्चा सुरू आहे.
…..
ठेकेदारांनी वाद मिटवून घ्यावे
…
मंद्रूप येथील शेंडगे वस्तीच्या रस्त्याच्या कामाचे कार्यारंभ देण्यात आले. मात्र भुरीकवठे येथील मजूर संस्थेने तक्रार केल्यामुळे रस्त्याचे काम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही ठेकेदारांनी आपापसातील तक्रार मिटवून घेतल्यानंतरच काम करण्याच्या सूचना देण्यात आली आहे. अन्यथा २० लाख रूपये निधी परत जाण्याची शक्यता आहे.

मनोज राऊत, गटविकास अधिकारी, पंचायत समिती दक्षिण सोलापूर
….
शेतकर्‍यांच्या त्रासाचे विचार करावे
…
शेंडगे वस्तीच्या रस्त्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शेतकर्‍यांच्या पाठपुराव्यामुळे २० लाख निधी मिळाला आहे. मात्र ठेकेदारांमधील वाद व अधिकार्‍यांच्या दबावतंत्रामुळे रस्त्याचे काम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार असून यामुळे शेतकर्‍यांना त्रास होणार आहे. म्हणून अधिकार्‍यांनी राजकारण न करता रस्ता करण्याचे आदेश द्यावे.

रेवणसिध्द शिंगडगाव,
शेतकरी, मंद्रूप
….

__________
“नवप्रभात न्युज पोर्टल”ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

मंद्रूपच्या लोकसेवा प्रशालेतील विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेतील यशाची परंपरा कायम

Next Post

टाकळीतील सिमेंट रस्त्यात घोटाळा ?

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
टाकळीतील सिमेंट रस्त्यात घोटाळा ?

टाकळीतील सिमेंट रस्त्यात घोटाळा ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

September 22, 2026
विद्यापीठातील  सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर”  नाव द्या

विद्यापीठातील सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर” नाव द्या

September 22, 2026
बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

September 22, 2026
दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

September 21, 2026
सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

September 21, 2026
ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

September 21, 2026
“फाईव्ह स्टार” शाळा निर्मितीसाठी दक्षिण पंचायत समितीचा पुढाकार,  इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी बीडीओंकडून नवोपक्रम राबविण्याच्या सूचना

दक्षिणच्या ५२ गावांचे “कारभारी” !

September 21, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

बदली होऊन दोन महिने झाले तरी शाखा अभियंता खुर्ची सोडेना !

September 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

139004

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697