Sunday, September 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पाटोद्याचे आदर्श सरपंच “भास्कर पेरे पाटील” १९ मे रोजी मंद्रुपमध्ये

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 14, 2026
in सोलापूर
0
पाटोद्याचे आदर्श सरपंच “भास्कर पेरे पाटील” १९ मे रोजी मंद्रुपमध्ये
0
SHARES
147
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चौडेश्वरी यात्रेनिमित्त मंद्रूपमध्ये शुक्रवारपासून विविध कार्यक्रम


मंद्रूप…
मंद्रुप येथील चौडेश्वरी देवीच्या यात्रेस शुक्रवार १५ मे पासून प्रारंभ होत असून यात्रेनिमित्त धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार १५ मे रोजी सकाळी ‘श्री’ ची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. रात्री ११.०० वाजता बाळबट्टल मिरवणूक सुवाद्यासह प्रदक्षिणा मार्गावरून निघणार आहे. शनिवार १६ मे रोजी दिवसभर ‘श्री’ स नैवेद्य अर्पण, गावातील सदभक्ताकडून बाशिंग बांधणी, ‘श्री’स ओटी भरणे तसेच ‘श्री’ ची सवाद्य मिरवणूक कार्यक्रम होणार आहे. रविवार दि.१७ मे रोजी महिलांकडून सुवासिनींना ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. शंकरलिंग महिला मंडळ प्रस्तुत आध्यात्मिक नाटक व लोककवी डॉ. सिद्धप्पा बिदरी यांच्या लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवार १८ मे रोजी कर्नाटकातील प्रसिद्ध गायिका भाग्यश्री म्हेत्री व गायक सुधाकर काळे यांच्याकडून कलगी तुऱ्यांचे गाणे , माळी गल्ली येथील सभागृहासमोर होणार आहे.
सायंकाळी उज्जैनी पीठाचे जगदगुरू डॉ. सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात प्रवचन होणार आहे. याप्रसंगी MPSC स्पर्धा परिक्षेत यश प्राप्त केलेल्या मैथिली कुमठेकर व ग्रामसेवक सविता कुंभार यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर प्रसिद्ध संमोहनतज्ञ राज गोंधळी यांच्याकडून विविध प्रयोग सादर होणार आहे.
या कार्यक्रमास भिमाशंकर म्हेत्रे, आप्पाराव कोरे, रमेश नवले, बक्षुभाई मुल्ला, नजीर आवटे, संतोष शहा, अनंत म्हेत्रे, रविशंकर म्हेत्रे, आंबण्णा काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार १९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता औरंगाबाद येथील पाटोदाचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे “माझा गाव, आदर्श गाव” या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान होणार आहे.
बुधवार २० मे रोजी सकाळी ९ वाजता बडगी आटा होणार आहे. दुपारी ५ वाजता नामवंत मल्लांच्या जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील सुतार बंधू प्रस्तुत माऊली संगीत सोंगी भजनी मंडळ यांच्या कार्यक्रमाने यात्रेचा समारोप होणार आहे.
या कार्यक्रमास अप्पर तहसिलदार विष्णू बुटे, मंद्रुप पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, फौजदार अमितकुमार करपे, राजकुमार डांगे, उद्योगपती लक्ष्मण सुतार, सतीश वेर्णेकर, मोतीराम चव्हाण, संतोष बरूरे, म्हाळप्पा घाले, महादेव शिंगडगाव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास परिसरातील भाविक व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष मळसिद्ध शिंगडगाव, गुरूसिद्ध म्हेत्रे, राजेश देशमुख, न्यासचे अध्यक्ष महादेव कुंभार, दयानंद ख्याडे, भगवान सुतार, विशाल केवटे, शिवानंद लोभे, पंचप्पा लच्याणे, मलकण्णा कुंभार, सिद्धाराम कुंभार, रमेश कुंभार, राजेश स्वामी आदींनी केला आहे.

__________
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

पंतप्रधानांच्या आवाहनामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर

Next Post

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट “सुखकर”: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट “सुखकर”: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट "सुखकर": केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

सोलापुरात वीरशैव लिंगायत समाजाचा मोफत वधू-वर मेळावा

September 20, 2026
सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

September 18, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

September 18, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

शाळांमध्ये दिसणार शासनमान्य शिक्षकेतर कर्मचारी !

September 18, 2026
देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

September 18, 2026
अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

September 18, 2026
सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

137310

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697