Sunday, September 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पंतप्रधानांच्या आवाहनामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 13, 2026
in सोलापूर
0
पंतप्रधानांच्या आवाहनामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंत्री, अधिकारी विदेश दौरे रद्द

– अत्यावश्यक सोडून विशेष विमान, हेलिकॉप्टर दौरे नको

– मंत्री, अधिकार्‍यांनी किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरावे

मुंबईः
इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोन उच्चस्तरिय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला आणि त्यानुसार काही निर्णय जाहीर केले. या बैठकांना मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जे प्रमुख निर्णय घेण्यात आले, ते असे..
– मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तत्काळ अर्ध्यावर आणण्यात यावी. बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलिस आयुक्त किंवा पोलिस अधीक्षक यांची असेल.
– मंत्री-अधिकार्‍यांनी कोणतेही विदेश दौरे करु नयेत.
– मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करु नये, त्याऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करावा.
– मंत्री-अधिकारी यांनी आवर्जून मेट्रो आदी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस असा प्रयोग करावा.
– अधिकार्‍यांना बैठकांना बोलावण्याऐवजी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात.
– शासनात वितरित करण्यात आलेल्या वाहनांचा कोटेकोरपणे आढावा घेण्यात यावा.
– ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्ज/फ्लेक्सवरील कारवाई वाढवण्यात याव्यात आणि तेथे डेकोरेटिव्ह लायटिंगचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.

…,

मुख्यमंत्र्यांचे क्वीक अॅक्शन

….

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंंत्री अमित शहा यांनी ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्व मंत्री व अधिकार्‍यांना इंधन बचतीसाठी सूचना केल्या. त्यानंतर पनवेल येथे झालेल्या दौर्‍यात वाहनांची संख्या कमी करून केवळ ४ वाहनांचा ताफा ठेवला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या क्वीक अॅक्शनमुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.

Previous Post

सोलापूर झेडपीकडून सोमवारी “नो व्हेईकल डे”

Next Post

पाटोद्याचे आदर्श सरपंच “भास्कर पेरे पाटील” १९ मे रोजी मंद्रुपमध्ये

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
पाटोद्याचे आदर्श सरपंच “भास्कर पेरे पाटील” १९ मे रोजी मंद्रुपमध्ये

पाटोद्याचे आदर्श सरपंच "भास्कर पेरे पाटील" १९ मे रोजी मंद्रुपमध्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

सोलापुरात वीरशैव लिंगायत समाजाचा मोफत वधू-वर मेळावा

September 20, 2026
सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

September 18, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

September 18, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

शाळांमध्ये दिसणार शासनमान्य शिक्षकेतर कर्मचारी !

September 18, 2026
देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

September 18, 2026
अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

September 18, 2026
सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

137332

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697