Sunday, September 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ११ लाख ५५ हजार किमतीचा मद्यसाठा जप्त

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 14, 2026
in सोलापूर
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ११ लाख ५५ हजार किमतीचा मद्यसाठा जप्त
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  बार्शी तालुक्यातील अवैद्य गोवा  बनावटीचा मद्य विक्रीवर कारवाई
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने सोलापूर जिल्ह्यात अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्यावर धडक कारवाई करत एकूण 11 लाख 55 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डाॅ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागीय भरारी पथकाने ही कारवाई केली.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात खामगाव- पिंपळगाव रस्त्यालगत पवार फार्महाऊस शेजारी झाडाझुडपामध्ये लपवून ठेवलेला मद्यसाठा महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये जप्त करण्यात आला. या कारवाईत गोवा बनावटीच्या “अॅडोरियल व्हिस्की”च्या 750 मिली क्षमतेच्या 1284 सिलबंद बाटल्या (107 बॉक्स) असा एकूण 11,55,600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच 22 एप्रिल 2026 रोजी माढा तालुक्यातील उपळाई गाव परिसरात अवैध मद्यविक्री करणाऱ्या ढाब्यावर कारवाईसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर काही ढाबेमालकांकडून हल्ला करण्यात आला होता. या घटनेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण होऊन ते जखमी झाले होते. त्यानंतर विभागीय उप आयुक्त यांच्या आदेशानुसार सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध मद्यसाठा व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने सदरची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान घटनास्थळी आढळून आलेल्या इसमास अटक करण्यात आली असून जप्त मद्य साठ्याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सदरची कारवाई निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक विराज माने, धीरज सस्ते, निनाद निकम, सहायक दुय्यम निरीक्षक अलिम शेख, जवान शशिकांत भट, राहुल तारळकर, प्रविण पुसावळे, हृतिक कोळपे तसेच वाहन चालक झिंगळे यांनी पार पाडली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक निनाद निकम करीत आहेत.
नागरिकांनी गोवा राज्यातील अथवा बनावट मद्यविक्रीची माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. अधिक माहितीसाठी व तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक 18008333333 वर संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाचे प्रमुख नरेंद्र थोरात यांनी केले आहे.
_______
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट “सुखकर”: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

Next Post

माध्यमिक शिक्षण विभागाचा “आॅनलाईन कामकाज”,

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
माध्यमिक शिक्षण विभागाचा “आॅनलाईन कामकाज”,

माध्यमिक शिक्षण विभागाचा "आॅनलाईन कामकाज",

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

सोलापुरात वीरशैव लिंगायत समाजाचा मोफत वधू-वर मेळावा

September 20, 2026
सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

September 18, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

September 18, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

शाळांमध्ये दिसणार शासनमान्य शिक्षकेतर कर्मचारी !

September 18, 2026
देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

September 18, 2026
अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

September 18, 2026
सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

137268

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697