Saturday, September 19, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

एक लाख कोटीच्या निधीतून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार … – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 15, 2026
in सोलापूर
0
एक लाख कोटीच्या निधीतून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार … – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुरत चेन्नई महामार्गामुळे सोलापूर जिल्ह्याचे चित्र बदलणार असून सोलापूर जिल्हा देशाचे लॉजिस्टिक हब बनेल

सोलापूर :- 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून पुढील तीन वर्षात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
अक्कलकोट येथे आयोजित सोलापूर जिल्ह्यातील सहा प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कर्नाटकछे नियोजन व धोरण आयोगाचे उपाध्यक्ष बी. आर. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, खासदार ज्योती वाघमारे, खासदार प्रणिती शिंदे, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख,आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. समाधान आवताडे, आ.देवेंद्र कोठे, आ. राजू खरे, महापौर विनायक कोंड्याल, राष्ट्रीय महामार्गाचे सचिव एस.जी. शेलार, राष्ट्रीय महामार्ग मुंबईचे विभागीय अधिकारी प्रशांत फेगडे, तांत्रिक सल्लागार संजय जयस्वाल आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले कि, २०१४ पर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी 565 किमी होती, ती आता 1750 किमीपर्यंत वाढली आहे. त्यावेळी 52 हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन झाले होते. त्यापैकी सोलापूर शहरातील उड्डाणपुलाचे काम वगळून सर्व कामे पूर्ण केल्याचे सांगून पुढील तीन वर्षाच्या काळात सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर घेऊन ते पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यामध्ये जुना पुना नाका ते बोरामणी नाका रस्त्यासाठी 1020 कोटी, अहमदनगर सोलापूर कर्नाटक सीमा पर्यंतच्या रस्त्यासाठी दहा हजार कोटी, राष्ट्रीय महामार्ग 65 वरील कामासाठी 48 कोटी, मुळेगाव येथील रस्त्यासाठी 35 कोटी अशा पद्धतीने रस्ते विकासाची कामे हाती घेतली जाणार आहेत. सुरत चेन्नई हा महामार्ग सोलापूर जिल्ह्याचे चित्र बदलणारा ठरेल. सोलापूर जिल्ह्यातील विविध महामार्गाच्या कामामुळे सोलापूर जिल्हा देशाच्या
मध्यभागी येऊन देशाचा लॉजिस्टिक हब बनेल असेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले.
शेती व जलसंवर्धनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सोलर पंप व ड्रिप सिंचनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते. पंढरपूर रिंग रोड, सोलापूर रिंग रोड, अक्कलकोट–दुधनी रस्ता यांसारख्या कामांना तसेच लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित केलेल्या सर्व कामांना मंजुरी दिल्याचे त्यांनी जाहीर केले. विकासकामांमध्ये राजकारण न करता सर्व समाजघटकांना समान लाभ मिळावा, हा त्यांचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आज भूमिपूजन होत असलेल्या सहा महामार्गामुळे अक्कलकोट येथे येणाऱ्या राज्याच्या विविध भागातील भक्तांना चांगल्या प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. तसेच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रस्त्याचे जाळे निर्माण झाल्याने या भागातील विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणेच अक्कलकोट गाणगापूर, मोहोळ ते वळसंग सोलापूर शहरात साठी रिंग रोड मंजूर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. खासदार प्रणिती शिंदे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.

प्रारंभी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर श्री गडकरी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने सहा महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
**************
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

शितल तेली—उगले पुणे विभागीय आयुक्त !

Next Post

उद्योग- व्यवसायातून महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्रियमंत्री गडकरी यांना “ताईं”चे निवेदन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
उद्योग- व्यवसायातून महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्रियमंत्री गडकरी यांना “ताईं”चे निवेदन

उद्योग- व्यवसायातून महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्रियमंत्री गडकरी यांना "ताईं"चे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

September 18, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

September 18, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

शाळांमध्ये दिसणार शासनमान्य शिक्षकेतर कर्मचारी !

September 18, 2026
देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

September 18, 2026
अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

September 18, 2026
सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

137323

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697