Sunday, September 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

शितल तेली—उगले पुणे विभागीय आयुक्त !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 15, 2026
in सोलापूर
0
शितल तेली—उगले पुणे विभागीय आयुक्त !
0
SHARES
175
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे विभागाच्या आयुक्तपदी प्रथमच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती

सोलापूर.. सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त शितल तेली—उगले यांची पुणे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी शीतल तेली-उगले यांच्याकडे या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी सोपवली असून, या निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात त्यांचं कौतुक होत आहे.
शितल तेली-उगले यांनी २१ नोव्हेंबर २०२२ ते १८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत  सोलापूर महापालिका आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत.
त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाला गती देणे, स्मार्ट सिटी प्रकल्प, आणि महापालिका इमारतीचे नूतनीकरण यांसारखे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
१८ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांची सोलापूरातून बदली करण्यात आली व त्यांच्या जागी डॉ. सचिन ओम्बासे सोलापूरचे नवे मनपा आयुक्त झाले. याशिवाय त्यांनी नागपूर, रायगड, पुणे या जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केली आहे.
पुणे विभागीय आयुक्त पदाची निर्मिती झाल्यापासून आजवर अनेक अनुभवी पुरुष अधिकाऱ्यांनी हे पद भूषवले आहे. मात्र, शीतल तेली-उगले यांच्या नियुक्तीने हा अनेक दशकांचा पायंडा मोडला असून, पुणे विभागाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर पाच जिल्ह्यांच्या समन्वयाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. या मोठ्या भौगोलिक क्षेत्रातील महसूल प्रशासन, कायदा व सुव्यवस्था आणि विकासकामांचे नियोजन करण्याची जबाबदारी आता तेली-उगले पार पाडणार आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विभागीय आयुक्त हे पद राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याने या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
….
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

रूचिताने दहावी परीक्षेतही मिळविले प्राविण्य

Next Post

एक लाख कोटीच्या निधीतून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार … – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
एक लाख कोटीच्या निधीतून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार … – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

एक लाख कोटीच्या निधीतून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार ... - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

बदली होऊन दोन महिने झाले तरी शाखा अभियंता खुर्ची सोडेना !

September 19, 2026
सोलापूरचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर!

सोलापूरचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर!

September 19, 2026
सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

September 18, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

September 18, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

शाळांमध्ये दिसणार शासनमान्य शिक्षकेतर कर्मचारी !

September 18, 2026
देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

September 18, 2026
अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

September 18, 2026
सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

137746

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697