Saturday, September 19, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

नागपूरच्या मंत्र्यांचे आमदार सुभाष देशमुख यांच्यावर “विशेष प्रेम”

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 15, 2026
in सोलापूर
0
नागपूरच्या मंत्र्यांचे आमदार सुभाष देशमुख यांच्यावर “विशेष प्रेम”
0
SHARES
141
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

फडणवीस, बावनकुळेंनंतर गडकरी निवासस्थानी

सोलापूर :  सिनियर आमदार व माजी मंत्री सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख यांचे सोलापूरच्या विकासात विशेष योगदान. मात्र सध्या आ. कल्याणशेटी व आ. कोठे यांच्या माध्यमातून विकासकामे होत असल्याने आ. देशमुखांचे वजन कमी पडत असल्याचे बोलले जात आहे. मात्र नागपूरचे मंत्री आ. देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिल्याशिवाय सोलापूर सोडत नसल्यामुळे पुन्हा एखदा आ. देशमुख यांचे राजकीय वजन सिध्द झाले आहे. त्यामुळे आ. सुभाष देशमुख यांच्यावर नागपूरच्या नेत्यांचे विशेष प्रेम असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील महत्त्वाच्या नागपूरमधील या तिन्ही नेत्यांनी अल्पावधीत देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने त्यांच्या राजकीय वजनाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या भेटीमुळे आ. देशमुख यांची नाराजी दूर होणार की त्यांना मंत्रीपदाची लाॅटरी लागणार ? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मात्र सिनियर असणारे आ. देशमुख यांचे वरिष्ठ पातळीवरील राजकीय वजनाचे प्रत्यय येत आहे.

      केंद्रीय मंत्री गडकरी  सोलापूरच्या दौर्‍यावर आल्यानंतर अक्कलकोट येथील कार्यक्रम संपल्यानंतर ना. गडकरी यांनी आ. सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी देशमुख कुटुंबियांनी गडकरी यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान सोलापूर शहरातील विविध विकासकामांवर चर्चा झाली. शहरातील दोन्ही उड्डाणपूल, आसरा पुलाबाबत चर्चा झाली. आमदार देशमुख यांनी हे प्रश्‍न त्वरित मार्गी लावण्याची मागणी केली. शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ना. गडकरी यांनी यांनी उड्डालपुलाची आपण घोषणा केली आहे, ते पूर्ण होतीलच असे सांगितले. यासाठी सर्व प्रकिया लवकरच पूर्ण केली जाईल, असे ते म्हणाले. जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यानच्या उड्डाणपुलासाठी 1020 कोटी रुपये मंजूर करत असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. यावेळी बाजार समितीचे संचालक मनिष देशमुख, रोहन देशमुख व भाजपाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. या भेटींमुळे सोलापूरच्या राजकारणात आमदार देशमुख यांचे वाढते महत्त्व अधोरेखित होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

*****************

नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
मो.नं. 9423535294

Previous Post

उद्योग- व्यवसायातून महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्रियमंत्री गडकरी यांना “ताईं”चे निवेदन

Next Post

गुडन्यूज ! अतिक्रमण केलेले नागरीक जागेचे मालक  होणार !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
गुडन्यूज ! अतिक्रमण केलेले नागरीक जागेचे मालक  होणार !

गुडन्यूज ! अतिक्रमण केलेले नागरीक जागेचे मालक  होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

September 18, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

September 18, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

शाळांमध्ये दिसणार शासनमान्य शिक्षकेतर कर्मचारी !

September 18, 2026
देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

September 18, 2026
अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

September 18, 2026
सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

137282

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697