Friday, September 18, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

गुडन्यूज ! अतिक्रमण केलेले नागरीक जागेचे मालक  होणार !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 16, 2026
in सोलापूर
0
गुडन्यूज ! अतिक्रमण केलेले नागरीक जागेचे मालक  होणार !
0
SHARES
247
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांना नियमितीकरणाची संधी

मंद्रूप तहसीलदार विष्णु बुटे यांच्याकडून मोहिमेची अंमलबजावणी सुरू

मंद्रूप…
गायरान वगळून अन्य शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणांच्या प्रश्नाला दिलासा देत मंद्रूप अप्पर तहसील प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले आहे. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीस प्रारंभ करत अतिक्रमण नियमितीकरण मोहिमेला वेग देण्यात आला असून, पात्र नागरिकांना कायदेशीर हक्क मिळवून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. व प्रांताधिकारी सुमित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विष्णु बुटे यांनी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणांच्या प्रश्नावर प्रशासनाने आता ठोस व गतिमान कारवाईची दिशा घेतली आहे.
या मोहिमेत १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे ठराविक अटींवर नियमित केली जाणार असून, अर्ज सादरीकरण, कागदपत्रांची पडताळणी, हरकतींची सुनावणी आणि भूमिअभिलेख विभागामार्फत मोजणी अशा टप्प्यांतून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पात्र नागरिकांना भोगवटादार वर्ग-२ दर्जा प्रदान करण्यात येणार असून, संबंधित जमिनीच्या हस्तांतरणावर पाच वर्षांची बंदी राहणार आहे. ५०० चौ. फुटांपर्यंत अतिक्रमण विनामूल्य नियमित करण्यात येईल, तर १५०० चौ. फुटांपर्यंतच्या अतिरिक्त क्षेत्रावर शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार शुल्क आकारले जाणार आहे.
दरम्यान गायरान, नदीपात्र, पूररेषा, सीआरझेड तसेच सार्वजनिक उपयोगाच्या जागांवरील अतिक्रमणे नियमितीकरणासाठी अपात्र ठरणार असून, अशा प्रकरणांमध्ये नियमानुसार नोटीस देऊन निष्कासनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
अर्ज सादरीकरणासाठी ३१ डिसेंबर २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून, पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विष्णु बुटे यांनी केला आहे.

….

पात्रतेसाठी महत्त्वाचे निकष…
…..
१ जानेवारी २०११ पूर्वीची अतिक्रमणेच पात्र

१) ५०० चौरस फुटापर्यंत अतिक्रमण विनामूल्य
२) १५०० चौरस फुटांपर्यंत अतिरिक्त क्षेत्रावर शुल्क
३)भोगवटादार वर्ग-२ दर्जा प्रदान
४) ५ वर्षे विक्री/हस्तांतरणास बंदी
५) अपात्र अतिक्रमणांवर थेट निष्कासन
६) गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमिती करणाच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहेत

पारदर्शक, वेळबद्ध आणि नियमबद्ध पद्धतीने राबवली जाणार आहे.
*************
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
मो.नं. 9423535294

Previous Post

नागपूरच्या मंत्र्यांचे आमदार सुभाष देशमुख यांच्यावर “विशेष प्रेम”

Next Post

“अण्णा”मुळे झेडपीत प्रथमच घुमला ‘टरबूर… टुटबूर’चा आवाज

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“अण्णा”मुळे झेडपीत प्रथमच घुमला ‘टरबूर… टुटबूर’चा आवाज

"अण्णा"मुळे झेडपीत प्रथमच घुमला 'टरबूर... टुटबूर'चा आवाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136594

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697