Friday, September 18, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“अण्णा”मुळे झेडपीत प्रथमच घुमला ‘टरबूर… टुटबूर’चा आवाज

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 16, 2026
in सोलापूर
0
“अण्णा”मुळे झेडपीत प्रथमच घुमला ‘टरबूर… टुटबूर’चा आवाज
0
SHARES
213
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मरीआई समाजाच्या विकासासाठी प्रशांत कडते यांची सिईओ जैन यांच्याशी चर्चा

सोलापूर…
पिढ्यानपिढ्या पोटाची खळगी भरण्यासाठी डोक्यावर मरीआईची मूर्ती, टोपली आणि गळ्यात डमरू घेऊन ‘टरबूर… टुटबूर… टरबूर… टुटबूर…’ असा आवाज करत भटकंती करणाऱ्या मरीआई समाजाच्या व्यथा , अडचणी व समस्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी मंद्रुप जिल्हा परिषद सदस्या सोनाली कडते व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कडते यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर झेडपीचे सिईओ कुशल जैन यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. दररोज पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणार्‍या मरीआईवाले समाजाच्या महिलांना डोक्यावर मरीआईची टोपली पाहून झेडपीचे पदाधिकारी व अधिकारी आश्चर्यचकीत झाले. मात्र शासनाच्या अनेक योजना या समाजासाठी असताना पिढ्यान् पिढ्या हा समाज विकासापासून वंचित आहे. म्हणून फ्रशांत कडते यांनी निवडणूकीत दिलेला शब्द पाळण्यासाठी सिईओ जैन यांची भेट घेऊन विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. त्यामुळे या समाजाला खऱ्या अर्थाने मदतीचा हात मिळताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूप येथील इंदिरानगर (मडीवस्ती) आणि संजयनगर परिसरात राहणाऱ्या या समाजाची अवस्था अत्यंत दयनीय असून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत अण्णा कडते यांनी पुढाकार घेतला आहे.
आजवर मंद्रूपने अनेक नेते, जिल्हा परिषद सदस्य , सभापती हे निवडणुका आल्या की या वस्त्यांमध्ये यायचे. आणि आश्वासन देऊन निघून जायचे. त्यामुळे केवळ ‘व्होट बँक’ म्हणून या समाजाचा वापर झाला. पण मतदानानंतर या समाजाच्या ताटात काय पडलं? गरिबी, अज्ञान आणि उपेक्षा . आपल्या लेकरा बाळांच्या हातात पाटी-पेन्सिल देण्याऐवजी, परिस्थितीने त्यांच्या हातात आजही देवीची टोपली आणि डमरूच दिला आहे . शिक्षणाचं प्रमाण शून्य आणि जगण्याची भ्रांत कायम, अशा दयनीय अवस्थेत हा समाज आज आपला जीव मुठीत घेऊन जगत आहे.
जिल्हा परिषद सदस्य सोनाली कडते यांचे पती आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कडते यांच्या नेतृत्वाखाली मरीआई समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांची भेट घेतली. मंद्रूप इंदिरानगर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेल्या आणि समाजाशी आपुलकीचे नाते जडलेल्या आरोग्य सेविका वैशाली जगताप यांची बदली रद्द करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली. या समाजासाठी शासनाच्या विशेष विकास योजना राबवून त्यांना हक्काचे घरकुल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे , यासारख्या अनेक प्रकारच्या मागण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी
सामाजिक कार्यकर्ते असलेल्या प्रशांत अण्णांनी या समाजाचा हात केवळ मतांसाठी नाही, तर त्यांच्या प्रगतीसाठी धरला आहे.भटक्या विमुक्त जातीसाठी विशेष योजना राबवणे, मुलांना शाळेत पाठवणे आणि या समाजाला ‘भिकेच्या’ नव्हे तर ‘हक्काच्या’ रोजगारापर्यंत नेणे, हा लढा आता सुरू झाला आहे. सिईओंनीही मरीआईवाले समाजाच्या विकासासाठी विशेष योजना पोहोचविण्याची ग्वाही दिली.
यावेळी प्रशांत कडते, सिद्धलींग म्हेत्रे, किसन मरीआईवाले, संजय मरीआईवाले, आजाराम मरीआईवाले, तायप्पा मरीआईवाले यांच्यासह समाजातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

********************

नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

गुडन्यूज ! अतिक्रमण केलेले नागरीक जागेचे मालक  होणार !

Next Post

मंद्रूप ग्रामपंचायत भ्रष्टाचारविरोधात ‘नरसप्पा’ची एंट्री

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मंद्रूप ग्रामपंचायत भ्रष्टाचारविरोधात ‘नरसप्पा’ची एंट्री

मंद्रूप ग्रामपंचायत भ्रष्टाचारविरोधात 'नरसप्पा'ची एंट्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136579

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697