Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मंद्रूप ग्रामपंचायत भ्रष्टाचारविरोधात ‘नरसप्पा’ची एंट्री

नागरीकांच्या भावनांचा आदर करण्याचे आवाहन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 16, 2026
in सोलापूर
0
मंद्रूप ग्रामपंचायत भ्रष्टाचारविरोधात ‘नरसप्पा’ची एंट्री
0
SHARES
403
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 नागरीकांना सोईसुविधा मिळवून देण्यासाठी वाढदिवसादिनी करणार आंदोलन

मंद्रूप..
‘स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची सेवा करणारे ‘नरसप्पा’ची भूमिका साकारणारे बलराज माने ‘ मंद्रूपच्या नागरीकांना सोईसुविधा मिळवून देण्यासाठी १ जूनला आंदोलन करणार आहेत. विशेष म्हणजे यादिवशी त्यांचा जन्मदिवस असताना मंद्रूप ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणार आहेत. विविध मालिकेतून मंद्रूपचे नाव देशभर पोहोचविणार्‍या कलावंताला हक्काचे सोईसुविधा मिळविण्यासाठी आंदोलन करावे लागणे म्हणजे दुर्दैव असल्याची चर्चा सुरू आहे.

     बलराज माने हे मंद्रूपमधील वाॅर्ड क्रमांक ३ मधील रहिवाशी आहेत.१८ वर्षापूर्वी त्यांना पुणे व मुंबई येथे जाऊन विविध मालिकेत व चित्रपटात भूमिका साकारले. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांनी पुरस्कार स्वीकारताना ‘जन्मभूमी’ मंद्रूपचा उल्लेख आवर्जून उल्लेख केला आहे. मात्र विविध कार्यक्रम व सण उत्सवाला मंद्रूपला आल्यानंतर घागर घेऊन पाण्याला जाण्याची वेळ त्यांच्यावर वारंवार आली आहे. शिवाय पाच सहा वर्षापूर्वी बनविलेला सिमेंट रस्ता खड्डेयुक्त झाल्याने पायी चालणेही मुश्कील बनला आहे. गावात अतिक्रमण वाढल्याने घरापर्यंत वाहने घेऊन जाणे मुश्कील बनले आहे. तसेच शाळा परीसरातील अतिक्रमणामधून दारू विक्री, मांसाहारी दुकाने व इतर अवैद्य धंदे सुरू असल्याने मुलांच्या शिक्षणावर विपरीत परीणाम होत आहे. याशिवाय इतर सोईसुवीधा मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याने बलराज माने यांनी कायमच्या ‘कटकटी’ला कंटाळून मंद्रूप ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षम विरोधात लढा उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत व इतर निवडणूकीत विविध पॅनल व पक्षाचे प्रचार करून उमेदवाराला विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलतात.

बलराज माने यांची झी मराठी, कलर्स मराठी, सन मराठी व स्टार प्रवाह चॅनलवरील ‘ बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ मध्ये पाटील, ‘सुंदरी’मध्ये सरपंच, ‘फुलाला सुगंध मातीचा’मध्ये इन्स्पेक्टर, ‘रंग माझा वेगळा’ मध्ये मिनीस्टर देशमुख, ‘स्वराज्यजननी जिजामाता’मध्ये यल्या, ‘लेक माझी लाडाची’मध्ये रमणिकलाल, ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये गुरूकुल ट्रस्टी, शिवाय ‘पृथ्वीराज चव्हाण’ हिंदी मालिकेत रूद्र भोपाला या त्यांच्या गाजलेल्या भूमिका आहेत. या भूमिकेतून त्यांनी मंद्रूपचे नावलौकीक केला असला तरी त्यांना गावात आल्यावर कोणत्याही सोईसुविधा मिळत नसल्याने त्यांनी आंदोलनाचा ‘पवित्रा’ घेतला आहे.

*************
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
मो.नं. 9423535294

Previous Post

“अण्णा”मुळे झेडपीत प्रथमच घुमला ‘टरबूर… टुटबूर’चा आवाज

Next Post

“होय, आम्ही झुरळ!” युवा महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“होय, आम्ही झुरळ!” युवा महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा

“होय, आम्ही झुरळ!” युवा महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136558

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697