Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“होय, आम्ही झुरळ!” युवा महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 21, 2026
in सोलापूर
0
“होय, आम्ही झुरळ!” युवा महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा
0
SHARES
150
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही!

सोलापूर ः 

देशातील कोट्यवधी युवक-युवती आज शिक्षण, रोजगार, महागाई, कंत्राटीकरण, पेपरफुटी, खासगीकरण आणि असुरक्षित भविष्य अशा असंख्य संकटांशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीकडून युवकांची तुलना “झुरळांशी” करण्यात येणे ही अत्यंत संतापजनक, अपमानास्पद आणि असंवेदनशील बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाने व्यक्त केली आहे. भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ जिल्हा समितीच्या वतीने सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी युवकांविषयी केलेल्या कथित विधानाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी तरुणांनी “होय, आम्ही झुरळ!” असे उपरोधिक विधान असलेली जॅकेट परिधान करून जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. निवेदनासोबत प्रतीकात्मक झुरळाची प्रतिमाही देण्यात आली. सदर निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत  राष्ट्रपती,  पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांना पाठविण्यात आले. यावेळी युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण, केंद्रीय समिती सदस्य ॲड. अनिल वासम, जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ, राज्य समिती सदस्य विजय हरसुरे, अश्विनी मामाड्याल, तसेच नरेश गुल्लापल्ली, अभिजित निकंबे, दिनेश बडगु, चंटी बिटला, राधागोपाल बंडी आदी उपस्थित होते.

युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲड. अनिल वासम म्हणाले कि, “हा केवळ शब्दांचा प्रश्न नसून देशातील तरुण पिढीच्या स्वाभिमानावर केलेला घाव आहे . युवक म्हणजे देशाची ऊर्जा, श्रम, बुद्धिमत्ता आणि भविष्य असून, कारखान्यात राबणारा कामगार युवक, शेतात घाम गाळणारा शेतकरी युवक, स्पर्धा परीक्षांसाठी आयुष्य झिजवणारा विद्यार्थी आणि बेरोजगारीशी झुंज देणारा पदवीधर हे “झुरळ” नसून भारताच्या प्रगतीचे खरे शिल्पकार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज देशातील लाखो युवक रोजगारासाठी रस्त्यावर उतरले आहेत. अनेकांनी नैराश्यातून आत्महत्या केल्या आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी व्यवस्था युवकांच्या मूलभूत प्रश्नांवर मौन बाळगून आहे. अशा वेळी न्यायासनावरून येणारे अपमानकारक वक्तव्य युवकांच्या जखमेवर मीठ चोळणारे असल्याची टीका करण्यात आली. संविधानिक पदांवरील व्यक्तींनी संयम, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी जपली पाहिजे; अन्यथा जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होईल, असा इशाराही युवा महासंघाने दिला.

युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण म्हणाले की, “देशातील युवक भीक मागत नाहीत, ते त्यांच्या हक्काची मागणी करत आहेत. आम्हाला ‘झुरळ’ समजणाऱ्यांनी लक्षात ठेवावे — याच युवकांच्या श्रमावर देश उभा आहे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकदही याच युवकांमध्ये आहे.” असेही म्हणाले.

*****************

नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

 

Previous Post

मंद्रूप ग्रामपंचायत भ्रष्टाचारविरोधात ‘नरसप्पा’ची एंट्री

Next Post

आचारसंहितेमुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आचारसंहितेमुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136551

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697