सोलापूर : जिल्हा नियोजन समितीची शुक्रवार २२ मे रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, सात रस्ता येथे आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती.
निवडणूक आयोगाने १८ मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची घोषणा केली असून आदर्श आचारसंहितेमुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे. याबाबत सर्व संबंधित कार्यान्वयन यंत्रणांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी केले आहे.
—————————————
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294









