Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

काॅंग्रेसची धुरा पुन्हा “सरां”वरच !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 21, 2026
in सोलापूर
0
काॅंग्रेसची धुरा पुन्हा “सरां”वरच !
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हाध्यक्षपदी पुन्हा सातलिंग शटगार सर यांची निवड

सोलापूर ः
महिन्याभरापूर्वी पक्षाचे निरीक्षक शहर व जिल्हाध्यक्षांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी पक्षनिरीक्षकांनी सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यात दौरा केला. त्यामुळे पक्षाला उभारी देण्यासाठी नवीन अध्यक्षाची नेमणूक होणार असल्याच्या चर्चेला होत आला होता. मात्र जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी संकटाच्या काळात काँग्रेस पक्षाला बळ दिल्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांनी पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड केली आहे. त्यामुळे पक्षाच्या हायकमांड कडून शटगार सरांवर विश्वास असल्याचे सिद्ध झाले आहे.
सातलिंग शटगार सर यांनी जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून जात असताना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात जाऊन पक्षाची ताकद वाढवली व पक्षाला ऊर्जितावस्था मिळवून दिली. त्यामुळेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू होते. सरांमुळेच काॅंग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे. जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसची  ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांमधून जनजागृती केली. तसेच आंदोलने व मोर्चा काढून पक्षाला उर्जितावस्था मिळवून दिली आहे. शिवाय माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार वारंवार अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले. या सर्वांची दखल घेऊन प्रदेश काँग्रेस कमिटीकडून पुन्हा एकदा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार सरांची निवड करण्यात आली आहे . शटगार सरांच्या निवडीबद्दल काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून अभिनंदन करण्यात येत आहे.

—————————————
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

आचारसंहितेमुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द

Next Post

कलाकारांच्या सुचनेनुसार नाट्यगृह उभारणार .

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
कलाकारांच्या सुचनेनुसार  नाट्यगृह उभारणार .

कलाकारांच्या सुचनेनुसार नाट्यगृह उभारणार .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136531

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697